कोरोनावरील लस 'फास्टट्रॅक'मध्ये बनवा ! कोरोना लस निर्मितीत भारताची मजल कुठवर?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 May 2020

कंपन्यांना लस फास्टट्रॅक बनवायला सांगितलं असून त्यामुळे कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखलं जाण्यात मदत होईल. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) डॉक्टर वीजी सोमाणी यांनी एका न्यूज वेबसाईटला यासंदर्भातली माहिती दिली आहे. 

मुंबई : जगभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. त्यातच भारतातही त्याचा फैलाव वाढताना दिसतोय. 4 मे रोजीपासून देशात तिसऱ्या लॉकडाऊनला सुरुवात झाली. कोरोनावर उपचार शोधण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यातच आता भारतातील 3 कंपन्यांनी कोरोनाची लस तयार केल्याची बातमी समोर येतेय. या तिन्ही भारतीय कंपन्यांना या लसीच्या क्लिनिकल ट्रायललाही मंजुरी मिळाली आहे. या तिन्ही कंपन्यांना केंद्र सरकारनं युद्धपातळीवर कोरोनावरील लस तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

या तिन्ही कंपन्यांना लस फास्टट्रॅक बनवायला सांगितलं असून त्यामुळे कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखलं जाण्यात मदत होईल. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) डॉक्टर वीजी सोमाणी यांनी एका न्यूज वेबसाईटला यासंदर्भातली माहिती दिली आहे. 

लवकरच येऊ शकते गोड बातमी ! १०० युनिटपर्यंत वीज मोफत? मंत्री नितीन राऊत यांचं मोठं वक्तव्य..

ग्लेनमार्क, केडिला हेल्थकेयर आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या तीन भारतीय कंपन्यांनी व्हायरससाठीची तयार केली आहे. या तिन्ही कंपन्यांना लशी कोरोनाविरुद्ध प्रभावी असल्याचं सुरुवातीच्या संशोधनात दिसून आलं. भारतातल्या रुग्णालयामध्ये या लशी रुग्णांना देऊन बघाव्यात, असं कंपन्यांना सांगण्यात आलं आहे. यासंबंधित एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, सुरक्षेमध्ये यशस्वी ठरलेल्या औषधाला लस बनवण्याचं काम दिलं जाईल. 

पुण्यात कोरोनाची लस विकसित 

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये तयार करण्यात आलेल्या लसीची भारतात क्लिनिकल ट्रायल घेण्यात येणार आहे. ग्लेनमार्कने फाविपीराविर (Favipiravir) नावाची लस तयार केली असून केडिला हेल्थकेयरने कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी alfa-2b नावाची लस बनवली आहे.

महाराष्ट्रात पहिल्यांदाच जीवघेण्या कोरोना व्हायरसवर लस विकसित करण्यात आली. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने, अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी कोडाजेनिक्सच्या मदतीनं ही लस विकसित केली आहे. 

कोरोनावर लस येण्याची शक्यता धुसर? चिंता वाढवणारा अहवाल

डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या वर्ष अखेरीपर्यंत या व्हायरसवर लस तयार होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. एकीकडे अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या मृतांचा आकडा थांबण्याचं नाव घेत नसताना डोनाल्ड ट्रम्प यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे चीननं ही कॅनसिनो बायोलॉजिक्स कंपनीनं लसीची चाचणी सुरु केली आहे. बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ बायोटेक्नॉलॉजीच्या सहकार्यानं ही लस तयार करण्यात आली आहे. 

त्यामुळे कोरोनाचा जन्मदाता चीन आणि अमेरिका या दोन्ही देशात कोरोनावर लस विकसित केल्याचा दावा करण्यात येत आहे.

three companies have started clinical trials of corona vaccine in india


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three companies have started clinical trials of corona vaccine in india