गणेश नाईकांच्या अडचणीत वाढ; पाहा नेमकं काय घडलं...
नवी मुंबई : ठाणे एमआयडीसीतील पावणे परिसरात तब्बल १३ हेक्टर जमिनीवर मंदिराचे बेकायदा बांधकाम करून, जागेचा वापर केल्याबद्दल एमआयडीसी बावखळेश्वर मंदिर ट्रस्टऐवजी आमदार गणेश नाईक यांच्याकडून खर्च वसूल करू शकते. नाईक यांचा बावखळेश्वर मंदिरात सहभाग असल्याचे याचिकाकर्ते संदीप ठाकूर यांनी एमआयडीसीला सिद्ध करून दाखवावे, असे मत उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान व्यक्त केले. उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर हे आपण लवकरच सिद्ध करणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
पावणे एमआयडीसीच्या परिसरात डोंगराच्या पायथ्याशी भूखंड क्रमांक १२ वर १११९.८२ चौरस मीटर क्षेत्रफळावर बावखळेश्वर ट्रस्टने तीन मंदिरे उभारली आहेत. मंदिरासोबतच एक फार्म हाऊस व खोदकाम करून तलाव तयार केला आहे. याचिकाकर्ते ठाकूर यांनी सादर केलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने मंदिराचे बांधकाम करून एमआयडीसीची जागा वापरल्याबाबत बावखळेश्वर ट्रस्टकडून भाडे वसूल करण्याचे निर्देश एमआयडीसीला दिले होते. हे भाडे तब्बल १०० कोटी रुपयांचे असल्याचा अंदाज एमआयडीसीने व्यक्त केला होता. त्यानुसार न्यायालयाने एमआयडीसीला १३ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करायला सांगितले होते.
ही बातमी वाचली का? धक्कादायक! देशात प्रत्येक १४५६ रुग्णांसाठी केवळ एक डॉक्टर
१३ डिसेंबरला पार पडलेल्या सुनावणीत एमआयडीसीने बावखळेश्वर ट्रस्टवर एकूण दहा कोटींचा खर्चाचा दावा केला आहे. मंदिर तोडण्यासाठी आलेला ४ कोटींचा खर्च व २००४ ते २०१३ पर्यंत जमीन वापरल्याबाबत साडेपाच कोटी रुपये असे दहा कोटी रुपयांचा खर्च बावखळेश्वर ट्रस्टकडून वसूल केला जाणार असल्याचे न्यायालयाला सांगितले; परंतु बावखळेश्वर ट्रस्ट हे पैसे न देता मंदिराचे सर्वेसर्वा गणेश नाईक असल्याचा दावा ठाकूर यांनी न्यायालयात केला. याबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचे ठाकूर यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानुसार न्यायालयाने संदीप ठाकूर यांना हे पुरावे एमआयडीसीला देऊन, नाईकांचा सहभाग सिद्ध असल्याचे करायला सांगितले आहे. ठाकूर यांनी हे पुरावे सादर केल्यास एमआयडीसी बावखळेश्वर मंदिराच्या तोडण्याचा खर्च नाईक यांच्याकडून वसूल करण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
आमदार गणेश नाईक यांनी एमआयडीसीच्या परिसरात मंदिर उभारण्याआधी वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिराती, त्यावेळच्या स्थानिक वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखती, असे बावखळेश्वर प्रकरणामध्ये नाईकांचा सहभाग सिद्ध करणारे अनेक पुरावे माझ्याकडे आहेत. ते लवकरच एमआयडीसीकडे सादर करणार आहे.
- संदीप ठाकूर, याचिकाकर्ते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.