Mumbai taxi rickshaw fare: मुंबईकरांच्या खिशाला कात्री! रिक्षा अन् टॅक्सीच्या भाड्यांमध्ये वाढ; 'एसटी'चा प्रवासही महागला

ST Bus: एसटी महामंडळाने तीन वर्षांत तिकीटदरात कोणतीही वाढ केली नव्हती. त्यामुळे तोटा भरून काढण्यासाठी महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाल्याने एसटीच्या तिकीटदरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Mumbai taxi rickshaw fare: मुंबईकरांच्या खिशाला कात्री! रिक्षा अन् टॅक्सीच्या भाड्यांमध्ये वाढ; 'एसटी'चा प्रवासही महागला
Updated on

मुंबई: सरकारने रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान दरात तीन रुपयांनी वाढ केली आहे. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण समितीची बैठक पार पडली. त्यामध्ये यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ऑटोरिक्षाचा दर पहिल्या टप्प्यासाठी २३ रुपये इतका होता. त्यात वाढ होऊन तो आता २६ रुपये इतका झाला आहे. टॅक्सीचा पहिल्या टप्प्यातील किमान दर २८ रुपये होता, त्यात वाढ होऊन तो आता ३१ रुपये झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com