कोविड लसीच्या चौकशी कॉल्समध्ये वाढ, दररोज 50 हून अधिक कॉल्स

भाग्यश्री भुवड
Friday, 22 January 2021

मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड रूममध्ये आता कोविड -19 लसीची माहिती घेणारे आरोग्य कर्मचाऱ्यांकडून दररोज सरासरी 40 ते 50 कॉल्स येत आहेत.

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड रूममध्ये आता कोविड -19 लसीची माहिती घेणारे आरोग्य कर्मचाऱ्यांकडून दररोज सरासरी 40 ते 50 कॉल्स येत आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लसीकरण केंद्रांना भेट देण्यापूर्वी लोक लसीची चौकशी करत आहेत ही एक चांगली बाब आहे. त्यामुळे, या लसी संबंधित असणारे गैरसमज दूर होतील आणि भविष्यात लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोक नोंदणी करतील.

लसीकरण मोहीम सुरू होऊन तीन दिवस झाले असले तरी शहरातील 10 केंद्रांमध्ये लाभार्थ्यांना लसीकरण मिळण्याचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे. मात्र, लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी 16 जानेवारीनंतर वॉर्ड रुमच्या हेल्पलाईन क्रमांकावरील  चौकशीत वाढ झाली आहे. शनिवारपासून प्रत्येक वॉर्ड कार्यालयात अशा प्रकारे जवळपास 40 ते 50 कॉल्स रेकॉर्ड होत आहेत.

कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, त्यांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्यापैकी बहुतेकांना ही लस घ्यावीशी वाटते. मात्र त्याबद्दल फारसे ज्ञान आणि माहिती मिळत नाही. “लसी संदर्भातील गैरसमज दूर होतोय याचा आनंद आहे. बरेच लोक कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड यांच्यातील फरक जाणून घेण्यासाठी कॉल करत आहेत. दरम्यान, लसीशी संबंधित सर्व शंका स्पष्ट झाल्यास लाभार्थ्यांची संख्या वाढेल, अशी आमची आशा आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दरम्यान, लसीकरण मोहीम रद्द करण्यास नकार देणाऱ्या हेल्थ केअर वर्कर्सना सल्ला देण्याची योजनाही पालिका करत आहे. पहिल्यांदा ते लस न घेण्यामागची कारणे रेकॉर्ड करतील. त्यानंतर, त्यांचा विश्वास बसण्यासाठी ते समुपदेशन देतील. निवडलेल्या लाभार्थ्यांचा विश्वास संपादन करत पाठपुरावा करुन सर्वांची यादी तयार केली जाईल आणि मग त्यांना सल्ला दिला जाईल. असेही डॉ. गोमारे यांनी सांगितले. 

तसेच केंद्रीकृत कोविन अॅपवरील तांत्रिक अडचणीमुळे पालिकेने सर्व वॉर्ड कार्यालयांना दररोज 4 हजार लाभार्थ्यांना कॉल करण्याची जबाबदारी दिली आहे असे एका वॉररुममध्ये काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले. शिवाय, दिवसाच्या प्रत्येक शिफ्टमध्ये किमान 10 ते 13 कॉल्स हे लसीबाबत चौकशीसाठी येतात. ज्यात आपले नाव यादीत आहे का? त्याचे काही दुष्परिणाम आहेत का ? यादीत नाव नसेल तर काय करावे ? असे अनेक प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांना वॉर्ड वॉररुममध्ये असलेल्या संबंधित अधिकाऱ्याकडून योग्य ती माहिती दिली जाते असे ए विभागाच्या वॉर रुममध्ये काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

हेही वाचा- अर्णब गोस्वामींविरोधात काँग्रेस आक्रमक, कथित चॅटविरोधात आंदोलन

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Increase in inquiries of covid vaccine more than 50 calls per day


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in inquiries of covid vaccine more than 50 calls per day