
राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींच्या कथित व्हॉट्सअप चॅटवरुन मैदानात उतरली आहे.
मुंबईः अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात काँग्रेसनं आज राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे. राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींच्या कथित व्हॉट्सअप चॅटवरुन मैदानात उतरली आहे. रिपब्लिक टीव्हीच्या कार्यालयावर मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते मोर्चा घेऊन गेले होते. दरम्यान काँग्रेसचा मोर्चा पोलिसांनी अडवला आहे. कमला मिलबाहेर पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा अडवला. यावेळी रिपब्लिक कार्यालयाबाहेर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवतण्यात आला होता.
यावेळी आक्रमक काँग्रेस कार्यकर्त्यांनी अर्णबविरोधात घोषणाबाजी करत, तात्काळ अटक करण्याची देखील मागणी केली. रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता या दोघांच्या व्हॉट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहे. विशेषतः बालाकोट सर्जिकल स्ट्राईक होण्याच्या तीन दिवस आधी याची माहिती अर्णब गोस्वामी यांना कशी मिळाली? असा सवाल काँग्रेसकडून विचारला जात आहे. यावर भाजप गप्प का? असा सवाल काँग्रेसनं केला आहे. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर मुंबईतील अर्णबच्या कार्यालयाबाहेर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्णब गोस्वामीविरोधात राष्ट्रवादीचे जोरदार आंदोलन
गली गली मे शोर है अर्णव गोस्वामी चोर है... अटक करा अटक करा अर्णब गोस्वामी याला अटक करा... अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसने अर्णब गोस्वामी यांच्या कार्यालयाबाहेर गुरुवारी जोरदार आंदोलन केले.
हेही वाचा- PMC Bank Scam: हितेंद्र ठाकुर यांच्या विवा ग्रुपच्या कार्यालयावर EDचा छापा
देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचे धिंडवडे काढणार्या अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसनेही अर्णब गोस्वामी याला अटक करण्यासाठी आणि देशाची गोपनीय माहिती देणार्या व्यक्तीचे नाव जाहीर करावे यासाठी त्याच्या रिपब्लिक टिव्हीच्या मुंबई येथील कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले.
Congress protests against Arnab Goswami chat leaks mumbai news