esakal | लॉकडाऊनमध्ये मानसिक समस्यांमध्ये वाढ, पालिकेला 30 सप्टेंबरपर्यंत 16 हजार कॉल्स
sakal

बोलून बातमी शोधा

लॉकडाऊनमध्ये मानसिक समस्यांमध्ये वाढ, पालिकेला 30 सप्टेंबरपर्यंत 16 हजार कॉल्स

कोविड 19 मुळे संपूर्ण जगाला जबरदस्त फटका बसला आहे. लोकांनी फक्त त्यांच्या नातेवाईकांना गमावले नाही तर त्यांना मानसिक आरोग्याच्या समस्याही ओढावल्या आहेत. 

लॉकडाऊनमध्ये मानसिक समस्यांमध्ये वाढ, पालिकेला 30 सप्टेंबरपर्यंत 16 हजार कॉल्स

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: कोविड 19 मुळे संपूर्ण जगाला जबरदस्त फटका बसला आहे. लोकांनी फक्त त्यांच्या नातेवाईकांना गमावले नाही तर त्यांना मानसिक आरोग्याच्या समस्याही ओढावल्या आहेत. 

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टला एप्रिल महिन्यापासून सुरू करण्यात आलेल्या मानसिक हेल्पलाइन क्रमांकावर सप्टेंबरपर्यंत 16,700 कॉल आलेत. जगभरातील सर्व देश कोरोना या साथीच्या आजाराशी लढा देत असताना प्रत्येकाला सामाजिक-आर्थिक समस्येच्या चिंतेने ग्रासले आहे. देशव्यापी टाळेबंदीत, हजारो ऑफिस कर्मचाऱ्यांनी नोकर्‍या गमावल्या आहेत.  महिला किंवा किशोरवयीन मुलींना लग्नासाठी भाग पाडले गेले. कंपन्या कामाचा अतिरिक्त दबाव आणत आहेत आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याबद्दल चिंता आहे. दिवसेंदिवस या चिंतेची यादी वाढतच चालली आहे. 

टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक-  1800-120-820050 एप्रिलमध्ये सुरू झाला होता. दररोज सरासरी 100 कॉल या क्रमांकावर आले आहेत, तर यापैकी बहुतेक कॉल चिंता, नैराश्य, झोपेच्या समस्या, योजनाचे प्रश्न आणि इतरांमधील नातेसंबंधातील समस्यांविषयी आहेत. 

हेल्पलाईनचे प्रमुख सल्लागार दिलशाद खुराणा म्हणाले, 'बहुतेक कॉल 26 ते 40 वयोगटातील तरुणांचे आले आहेत. नोकरी गमावणे आणि लॉकडाऊनमधील कुटुंब आणि पती-पत्नी यांच्याशी जुळवून घेण्याची समस्या ही त्यांची मुख्य चिंता आहे.' कॉल करणार्‍यांपैकी जवळपास 70 टक्के पुरुष आणि 30 टक्के महिलांचा समावेश आहे. दुपारी 3 ते 8 दरम्यान हेल्पलाईनला सर्वाधिक कॉल येतात.

अधिक वाचाः  डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणः तिन्ही आरोपींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

एप्रिलमध्ये हेल्पलाईनवर 11,932 प्राप्त झाले जे हळूहळू कमी होऊ लागले. मेमध्ये त्यांनी 1,879 कॉल रेकॉर्ड केले जे पुढच्या महिन्यात 971 वर घसरले. जुलैमध्ये, 671 कॉल नोंदवण्यात आले. जे ऑगस्टमध्ये 600 पर्यंत कमी झाले. सप्टेंबरमध्ये ही संख्या थोडीशी वाढून 650 वर गेली. 

खुराणा म्हणाल्या, की यापूर्वी त्यांना कोविड -19 शी संबंधित कॉल येत होते. मात्र आता लोकांना योग्य माहिती दिल्यामुळे संसर्ग होण्याची भीती कमी झाली आहे. 'मे पर्यंत बरेचसे कॉल कोविड -19 शी संबंधित होते कारण लोकांना खूप भीती वाटत होती. कारण, त्यांना त्यांचा शेजारीही कोविड पॉझिटिव्ही येत आहे याची भीती होती. लोक सोशल मीडियावर पसरणार्या खोट्या फॉरवर्डवर विश्वास ठेवतात. आता लोकांना याबाबतची अधिक माहिती झाल्याने असे कॉल स्वीकारणे बंद केले आहे.'

अधिक वाचाः  बिहार निवडणूक 2020: शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हावर लढता येण्याची शक्यता कमी

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा म्हणाले, मानसिक रोगांबद्दल लोकांनी बोलण्याची वेळ आली आहे आणि त्यांना नैराश्य किंवा चिंताग्रस्त वाटत असल्यास डॉक्टर किंवा जवळच्या लोकांसोबत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या पाहिजे. 'मनोरंजन उद्योगातील बहुतेक लोक मानसिक आरोग्याच्या समस्यांमधून जात आहेत आणि सर्वसाधारणपणे, त्या लपवण्याकडे त्यांचा जास्त कल असतो. उद्योग करणारे माझे बरेच रुग्ण तेव्हा आले आहेत जेव्हा ते तीव्र नैराश्यात असतात. ते इतके चिंताग्रस्त आहेत की व्यावसायात काम करणे अशक्य होत आहे.'

-----------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Increase in mental problems in lockdown 16 thousand calls BMC by September 30