
धमकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ
मुंबई : राज ठाकरे यांना नुकतीच पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, यापार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षेचा दर्जा कायम ठेवण्यात आला आहे पण पोलिसांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती सुत्रांकडून कळते. (Increased security of MNS president Raj Thackeray against the backdrop of threats)
हेही वाचा: ट्विटर डील तात्पुरती स्थगित; मस्क यांनी सांगितलं कारण
सुत्रांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांना जीवेमारण्याच्या धमकी पत्र राज ठाकरेंच्या घरी आलं होतं. त्यानंर नांदगावकर पोलिसांना भेटायला आले होते.
हेही वाचा: भाजप लोकांना भीतीच्या वातावरणात जगण्यास भाग पाडतेय : सोनिया गांधी
या धमकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा वाय प्लस हा सुरक्षा दर्जा कायम ठेवण्यात आला आहे मात्र एक पोलीस अधिकारी आणि एक अंमलदाराची यामध्ये वाढ करण्यात आली आहे. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन ही वाढ करण्यात आली आहे.
Web Title: Increased Security Of Mns President Raj Thackeray Against The Backdrop Of Threats
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..