
मुंबई : शहरात पावसाळा सुरू होताच मलेरियाच्या संसर्गाचा धोका वाढतो. विशेषतः बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी डासांची उत्पत्ती अधिक होते. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने जून महिन्यात आतापर्यंत सुमारे ५० हजार बांधकाम मजुरांची मलेरिया तपासणी केली आहे.