रोग प्रतिकारशक्ती वाढवताय, मग 'हे' नक्की वाचा....

रोग प्रतिकारशक्ती वाढवताय, मग 'हे' नक्की वाचा....

मुंबई, ता. 12 : संपूर्ण देशभरात कोरोना संसर्ग वेगाने पसरत असल्याने आपण आपली काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी अनेक औषध किंवा गोळ्या तसेच खाद्य पदार्थ खाण्याचा सल्ला आपल्याला दिला जातो. मात्र यातही काही सल्ले आपल्या आरोग्यावर परिणाम करणारे तसेच जीवितास धोका पोचवणारे ठरू शकतात. त्यामुळे कोणतीही गोष्ट काळजीपूर्वक आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन करण्याचं आवाहन तज्ज्ञ करतात.

औषध आणि गोळ्यांचे अमाप सेवन -

सोशल मीडिया किंवा इंटरनेटवर वाचून औषधांच्या बऱ्याच कंपन्यांकडून एखादे औषध किंवा गोळ्या खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्याचा दावा केला जातो. मात्र असे अजूनतरी सप्रमाण सिद्ध झालेले नाही. त्यामुळे लोकांनी अशी औषध खरेदीसाठी गर्दी करण्यात काहीही अर्थ नाही असे तज्ञ सांगतात. जे योग्य आहे आणि सप्रमाण सिद्ध झाले आहे अश्या वस्तू डॉक्टरांना घेण्याकडे कल ठेवण्याचा सल्ला ही डॉ. अंकिता देतात.

माणापेक्षा अधिक ताण घेऊ नका -

एखाद्या संकटाचा खंबीरपणे सामना करण्याचे हे महत्वाचे सूत्र आहे. आपण जर एखाद्या गोष्टीचा प्रमाणापेक्षा अधिक ताण घेतला तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. अति ताण तुमच्या आरोग्याला धोका निर्माण करू शकतो असे डॉ अंकिता घाग सांगतात. एखाद्या गोष्टीमुळे संतापू नका, शांत राहण्याचा प्रयत्न करा, असे ही त्या पुढे म्हणाल्या. ताण - तणाव आपल्या रोगप्रतिकारशक्ती वर परिणाम करतो. त्यामुळे आनंद देणाऱ्या गोष्टी करण्यात गुंतणे आवश्यक असल्याचे ही त्या सांगतात.

एक्सरसाईज -

थकवा येईपर्यंत एक्सरसाईज केली तर आरोग्य सुदृढ होईल किंवा रोगप्रतिकारशक्ती वाढेल हा गैरसमज असल्याचे डॉ अंकिता सांगतात. दररोज केवळ 10 मिनिटे एक्सरसाईज ही पुरेशी आहे. जे लोक जिम मध्ये जात नाहीत त्यांनी "वॉकिंग" किंवा "रनिंग" वर भर द्यायला काही हरकत नसल्याचे ही त्या म्हणाल्या. मात्र कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर केल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो असा निष्कर्ष अभ्यासात पुढे आला आहे. एक्सरसाईज उत्तम आरोग्याचा गुरुमंत्र आहे. मात्र एक्सरसाईज योग्य  प्रमाणात आणि योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे अन्यथा त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो असा इशारा ही त्या देतात.

पुरेशी झोप - 

तरुण व्यक्तीसाठी दिवसातील सात ते आठ तास चांगली झोप घेणे आवश्यक आहे. लहान मुलांनी त्यांच्या वयाप्रमाणे झोप घेणे गरजेचे आहे.आजारपणात तुम्ही योग्य वेळी योग्य औषधोपचार करणे आवश्यक आहे. खास करून ताप येत असल्यास योग्य उपचार घ्यावेत.


संतुलित आहार -

संसर्गाच्या काळात संतुलिक आणि आरोग्यवर्धक आहार घेणे फार महत्वाचे आहे. आहारात अश्या पदार्थांचा समावेश असावा ज्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि ज्यामुळे शरीरातील विषाणूंचा नाश होईल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अँटिबॉयोटिक्स चे अति सेवन टाळावे कारण त्यांच्यामुळे शरीरातील इतर इन्फेक्शन कमी करणाऱ्या आवश्यक असणाऱ्या बॅक्टेरियाचा ही नाश करतात असे ही तज्ज्ञ पुढे सांगतात. लसूण, कांदा, आलं अंडी आंबवलेले पदार्थाचे सेवन करावे त्यामुळे तुमच्या शरीरातील मायक्रोबायोमी ला उपयुक्त ठरेल असे यांचे म्हणणे आहे.


आपला आहार पहा -

आपल्याला पुरेसे झिंक आणि व्हिटॅमिन डी आणि इतर महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळावे यासाठी भरपूर रंगीबेरंगी फळे आणि भाज्यांनी भरलेल्या निरोगी, संतुलित आहारावर भर द्या. बर्‍याच तज्ञांचे म्हणणे आहे की आपण आपल्या आहारातून आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात मिळविण्यास सक्षम असावे त्यासाठी अतिरिक्त गोळ्या किंवा औषधे घेण्याची आवश्यकता नाही. परंतु व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्यास अशी औषधे घेण्याची तज्ज्ञ  शिफारस करतात.

हिरव्या पालेभाज्यांचं सेवन - 

भरपूर गडद हिरव्या, पालेभाज्या आणि बेरी तसेच शेंगदाणे आणि बिया खाण्याचा सल्ला देतात. तर पौष्टिक नसलेले साखर आणि ट्रान्स फॅट्स असलेले पदार्थ कमीतकमी खाण्याची शिफारस करतात. आपल्या रोगप्रतिकारक यंत्रणेस उर्जा मिळणे आवश्यक आहे, म्हणून अल्ट्रालो-कार्बोहायड्रेट आहार टाळा, असे तज्ञ म्हणतात. याव्यतिरिक्त, भरपूर पाणी प्या आणि अल्कोहोलचे सेवन कमी करा, जे आपल्या झोपेमध्ये अडथळा आणू शकते.

धुम्रपान टाळा - 

श्वसन रोग , गंभीर आजार आणि कोरोनाव्हायरस सारख्या आजाराच्या  लक्षणांचे प्रमाण अधिक आहे अश्या व्यक्तींनी धूम्रपान टाळणे गरजेचे आहे असे ही तज्ञ म्हणतात. तुमच्या फुफ्फुसांवर परिणाम होईल अशी कोणते ही व्यसन न करण्याचा सल्ला डॉ अंकिता घाग देतात. 

increasing your immunity read this news news report first

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com