
मुंबई : जागतिक स्तरावरील नकारात्मक परिस्थितीमुळे आज भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी विक्रीवर भर दिल्याने ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ने जोरदार घसरण नोंदवली. शेवटच्या तासात औद्योगिक व तेल आणि वायू कंपन्यांच्या शेअरमध्ये विक्रीचा मारा झाल्याने निर्देशांकांना सुरुवातीची तेजी टिकवता आली नाही आणि दिवसअखेर ‘सेन्सेक्स’ २१७ अंशांनी, तर ‘निफ्टी’ ९२ अंशांनी खाली आला.