
खवळलेल्या समुद्रात कोस्ट गार्डचं यशस्वी ऑपरेशन
मुंबई: 'तौत्के' चक्रीवादळामुळे (cyclone) समुद्राला आज उधाण आले आहे. समुद्र प्रचंड खवळला आहे. वादळाच्या धोक्यामुळे मच्छीमारांना (fisherman deep fishing) खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नका असे सांगण्यात आले होते. पण तरीही काही मच्छीमारी नौका खोल समुद्रात मासेमारीसाठी गेल्या होत्या. वादळामुळे समुद्राने रौद्ररुप धारण केल्यानंतर गोव्याच्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेली एक नौका अडकली. (Indian Coast Guard Ship Samarth responding to a distress call rescued 15 crew)
या नौकेवरील खलाशांनी मदत मागितल्यानंतर तटरक्षक दल या खलाशांच्या मदतीला धावून आले. इंडियन कोस्ट गार्डच्या समर्थ जहाजाने खवळलेल्या समुद्रात १५ मच्छीमारांची सुटका केली. कोस्टगार्डने अत्यंत सहजतेने हे ऑपरेशन केले. बोटीवरील सर्व खलाशी सुखरुप असून बोटीला टो करुन किनाऱ्यावर आणण्यात आले. तौत्केच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्याच्या काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे.
राज्याच्या किनारपट्टी भागांना या वादळाचा चांगलाच तडाखा बसला आहे. घरांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. समुद्र प्रचंड खवळलेला आहे. या परिस्थितीत तटरक्षक दल, नौदल आपल्या साहसाचा परिचय देत आहेत.