
Orchestras Bars
ESakal
मुंबई : अंधेरी आणि विलेपार्ले पोलीस ठाण्यांच्या अधिकारक्षेत्रातील पोलीस कर्मचाऱ्यांकडून रेस्टॉरंट्स आणि ऑर्केस्ट्रा बार चालविणाऱ्यांचा छळ सुरू असून पोलिसांकडून अधिकाराचा गैरवापर होत असल्याचा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. मुंबईतील बार, रेस्टॉरंट्स आणि ऑर्केस्ट्रा आस्थापनांच्या मालकांचे प्रतिनिधित्व करणारी नोंदणीकृत कामगार संघटना इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने (आहार) ही याचिका केली आहे.