लॉकडाऊनमध्ये 'अशी' कमी करा दारूची तलफ

लॉकडाऊनमध्ये 'अशी' कमी करा दारूची तलफ

मुंबई: कोरोनामुळे भारतात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांची दुकानं वगळता बाकी सर्व दुकानं बंद असणार आहेत. मात्र  लॉकडाऊनमुळे गोची झालीये ती मद्यपींची. दररोज न चुकता दारु पिणाऱ्यांची यामुळे चांगलीच तारांबळ उडाली आहे. त्यात पंतप्रधान मोदींनी अचानक लॉकडाऊनची घोषणा केल्यामुळे आधी स्टॉक जमा करता न आल्याची खंत काही लोकांकडून सोशल मीडियावर व्यक्त केली जातेय. दररोज दारू पिणाऱ्या मद्यपींना जर एक दिवसही दारू मिळाली नाही तर ते चीडचीड करू लागतात किंवा त्यांना राग अनावर होऊ शकतो.  दारू मिळाली नाही तर त्यांचं मानसिक संतुलन बिघडण्याचीही शक्यता असते. याचा परिणाम या मद्यपींच्या परिवाराला भोगावा लागतो. अनेकदा या लोकांच्या कुटूंबाला त्यांच्या मानसिक अस्वाथ्याचा सामना करावा लागतो.

या मद्यपींना १८ ते २४ तास दारू  मिळाली नाही तर अशा लोकांमध्ये अल्कोहोल विड्रॉलचे लक्षणं दिसून येतात. जे त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्यासाठी घातक ठरू शकतात. या लक्षणांमुळे या मद्यपींना अल्कोहोल ऍडिक्शन नावाचा रोग होऊ शकतो ज्यामध्ये अशा लोकांना सतत अंग थरथरणे, झोप कमी येणे, भूक न लागणे, चीडचीड होणे, राग येणे असे त्रास होऊ शकतात.

या रोगाचं गंभीर रूप तेव्हा बघायला मिळत जेव्हा रोज दारू पिणाऱ्या लोकांना १०-१२ दिवस दारू मिळत नाही. यात त्यांना अनेक प्रकारचे भास होतात. न घडलेल्या किंवा कधीही घडू न शकणाऱ्या घटनांचा त्यांना भास होऊ लागतो. तसंच तारीख आणि वेळेचं भान राहत नाही. अशा लोकांना पुढे मानसिक आजारांना तोंड द्यावं लागतं.

अशी कमी करा दारू पिण्याची तलफ:

ज्यांना रोज दारू पिण्याची सवय आहे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी त्यांचं रोज दारू पिण्याचा प्रमाण २० टक्क्यांनी कमी करण्याची गरज आहे. ज्यामुळे त्यांना अल्कोहोल विड्रॉलचा त्रास होणार नाही आणि त्यांचा मानसिक संतुलन चांगलं राहील.

  • अशा व्यक्तींच्या  खाण्यापिण्यावर लक्ष ठेवा.
  • अशा व्यक्तींना दररोज ३ लिटर पाणी प्यायला द्या.
  • इलेकट्रॉल पावडर किंवा ओआरएस त्यांना पिण्यासाठी द्या.
  • त्यांच्या डायबिटीज किंवा ब्लड प्रेशरच्या गोळ्या त्यांना वेळेवर द्या.
  • मानसिक आजार आणि शरीर स्वास्थ्यासाठी त्यांना योगासनं करायला सांगा.
  • रोज ३० मिनीट व्यायाम करायला सांगा.
  • योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • अशा लोकांना औषधं वेळेवर घ्यायाला सांगा.

indian lockdown how to deal with liquor withdrawal symptoms during corona virus crisis

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com