IPL: डी. वाय. पाटील स्टेडियम मध्ये रंगणार सामने; यजमान शहर म्हणून नवी मुंबई सज्ज

Dy Patil Stadium
Dy Patil StadiumGoogle

वाशी : २७ मार्च ते १८ मे या कालावधीत नवी मुंबईतील (Navi Mumbai) डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये (Dy Patil stadium) इंडियन प्रीमियर लीग (Indian premier league) अर्थात आयपीएलचे २० सामने खेळविण्यात येणार आहेत. त्‍यानिमित्त जगभरातील नामांकित क्रिकेटपटू व क्रीडा रसिक नवी मुंबईत येणार आहेत. यजमान शहर म्हणून नवी मुंबईचा नावलौकिक व्हावा, यादृष्टीने महापालिका आयुक्त अभिजित बांगर (Abhijit Bangar) यांनी आयपीएलच्या अनुषंगाने करायच्या कामांचे नियोजन करण्यासाठी क्रीडा विभाग व संबंधित विभागांची नुकतीच आढावा बैठक घेतली.

Dy Patil Stadium
नवी मुंबई ठरलं राज्यातील पहिलं शहर; दोन्ही डोसचे १०० टक्के लसीकरण पूर्ण

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई, क्रीडा विभागाचे उपआयुक्त मनोजकुमार महाले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, उद्यान विभागाचे उपआयुक्त जयदीप पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, परिवहन व्यवस्थापक योगेश कडुसकर, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड व इतर अधिकारी उपस्थित होते. नवी मुंबईत होणाऱ्या आयपीएलच्या २० सामन्यांपैकी १६ सामने हे प्रकाशझोतात खेळविले जाणार आहेत.

त्या अनुषंगाने प्रामुख्याने वाहन पार्किंग व्यवस्थेकडे पोलिस विभागाच्या सहकार्याने विशेष लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचित केले. स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या २५ टक्के प्रेक्षकांना प्रत्यक्ष स्टेडियमध्ये बसून सामने पाहता येणार असल्याने किमान ५ हजार गाड्यांच्या पार्किंगचे नियोजन करावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले. पार्किंगसाठी निश्‍चित केलेल्‍या जागांची माहिती क्रीडा रसिकांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध माध्यमांतून व्यापक प्रसिद्धी करावी, अशा सूचना देण्यात आल्‍या आहेत.

स्वच्छ व सुंदर शहर हा नवी मुंबईचा नावलौकिक असून नुकत्याच झालेल्या आशियाई महिला फुटबॉल चषक आंतरराष्ट्रीय स्पर्धेनंतर लगेचच आयपीएलचे सामने नवी मुंबईत होत आहे. हा या शहरासाठी सन्मान आहे. त्यामुळे क्रिकेटसारख्या सर्वाधिक लोकप्रिय खेळ बघण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन जागतिक कीर्तीचे खेळाडू व क्रीडा रसिकांचे स्वागत करताना त्यांच्या नजरेत शहराची प्रतिमा उंचावेल, अशाप्रकारे नियोजन करण्याकडे काटेकोर लक्ष द्यावे.
- अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com