Indigo Flight Service: प्रवाशांना रेल्वेचा आधार! ‘इंडिगो’ची उड्डाणे रद्द; २२ विशेष एक्स्प्रेस गाड्या

Indian Railway: इंडिगो एअरलाइन्सच्या विमानसेवा विस्कळित झाल्याने प्रवासी अडचणीत सापडले आहेत. यामुळे भारतीय रेल्वेने पुढाकार घेत विशेष गाड्या सोडून प्रवाशांना दिलासा दिला आहे.
Indian Railway Ran Special Trains After Indigo Flight Service Disruption

Indian Railway Ran Special Trains After Indigo Flight Service Disruption

sakal 

Updated on

मुंबई : इंडिगो एअरलाइन्सच्या विमानसेवा विस्कळित झाल्याने देशभरातील हजारो विमानप्रवासी अडचणीत सापडले असताना, भारतीय रेल्वेने तातडीने पुढाकार घेत प्रवाशांना दिलासा दिला आहे. मध्य रेल्वेसह विविध विभागांनी देशातील महत्त्वाच्या मार्गांवर २२ विशेष गाड्या चालविल्या, तर नियमित लांब पल्ल्याच्या गाड्यांना अतिरिक्त डबे जोडून प्रवाशांची वाढती गर्दी सामावून घेण्यात आली. या व्यवस्थेला प्रवाशांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, अप-डाऊन मार्गांवर १६ हजारांहून अधिक प्रवाशांनी रेल्वेने प्रवास केला आहे. विशेष म्हणजे मध्य रेल्वेने चालविलेल्या विशेष गाड्यांपैकी हावडा-सीएसएमटी विशेष गाडीला सर्वाधिक पसंती मिळाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com