

मुंबई : शेतकऱ्यांना भाजीपाला (Farmers), फळे, नाशवंत पदार्थ, दूध आणि शेती उपायोगी सामग्रीची वाहतूक करण्यासाठी भारतीय रेल्वेवरून (Indian Railway) किसान रेल्वे (kisan Railway) चालविण्यात येत आहे. सर्वात प्रथम मध्य रेल्वेवरून (central railway) किसान रेल्वे चालविण्यात आली. त्यानंतर नुकताच किसान रेल्वेच्या मध्य रेल्वेतून 700 फेऱ्या (seven hundred round) पूर्ण झाल्या आहेत. मध्य रेल्वे किसान रेल्वेद्वारे भारतभर 2 लाख 44 हजार टन फळे आणि भाज्यांची वाहतूक (fruit transportation) केली.
मध्य रेल्वेने सांगोला ते आदर्श नगर दिल्लीपर्यंत 700 वी फेरी 23 ऑक्टोबर रोजी पूर्ण केली आहे. किसन रेल्वेच्या मध्य रेल्वेतून 700 वी फेरी पूर्ण केल्याने शेतकऱ्यांच्या समृद्धीला पुढे नेणारा सर्वात यशस्वी आणि सर्वात मोठा गेम चेंजर उपक्रम ठरला आहे. जलद वाहतूक, शून्य अपव्यय, 50% अनुदानासह कृषी उत्पादनासाठी मोठ्या आणि नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश सुनिश्चित करून किसान रेल्वे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना समृद्धी, आनंद आणि आशा देत आहे. पहिली किसान रेल्वे सुरू झाल्यापासून मध्य रेल्वेने किसान रेल्वेच्या 700 फेऱ्यांमध्ये 2 लाख 43 हजार 524 टन नाशवंत मालाची वाहतूक केली आहे.
पहिली किसान रेल 7 ऑगस्ट 2020 रोजी चालविण्यात आली होती. तर, त्यानंतर 28 डिसेंबर 2020 रोजी किसान रेलची 100 वी फेरी चालवण्याचा मान मध्य रेल्वेला मिळाला होता. या फेरीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेबलिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवला होता. किसान रेल्वेची 500 वी फेरी 12 ऑगस्ट 2021 रोजी चालविली. तर, आता किसान रेलची 700 वी फेरी 23 ऑक्टोबर 2021 रोजी सांगोला येथून आदर्श नगर, दिल्ली करीता निघाली झाली.
सोलापूर भागातून डाळिंब, द्राक्षे, लिंबू, शिमला मिर्ची, कस्तूरी खरबूज, पेरू, सिताफळ, बेर (इंडियन प्लम); लातूर आणि उस्मानाबाद भागातून फुले, नाशिक प्रदेशातून कांदा, भुसावळ आणि जळगाव भागातून केळी, नागपूर प्रदेशातून संत्री या सामग्रीची किसान रेलच्या माध्यमातून दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल सारख्या दूरच्या बाजारपेठांमध्ये फळे आणि भाजीपाला त्वरीत आणि ताज्या पोहचले आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावून मोठ्या बाजारपेठांसह चांगला महसूल मिळतो, त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव, जलद वाहतूक, कमीत कमी उत्पादन वाया जाते. किसान रेल्वे ग्रामीण महाराष्ट्रातील लोकांसाठी प्रगती आणि समृद्धीचे इंजिन बनले आहे.
सरकारने ऑपरेशन ग्रीन - टॉप टू टोटल या आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत सरकारच्या व्हिजनचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांना 50% अनुदान देखील वाढवले आहे. यामुळे रेल्वे शेतकऱ्यांच्या वाहतुकीसाठी पहिली पसंती बनली. देवळाली -मुझफ्फरपूर, सांगोला -मुझफ्फरपूर, सांगोला -आदर्श नगर दिल्ली, सांगोला -शालीमार, रावेर -आदर्श नगर दिल्ली, सावदा -आदर्श नगर दिल्ली आणि गोधनी -आदर्श नगर दिल्ली या मार्गावरून मध्य रेल्वेच्या सध्या 7 किसान रेल्वे चालविण्यात येत आहे. किसान रेल्वेच्या 700 फेऱ्या शेतकऱ्यांना जलद आणि सुरक्षित वाहतूक करतात आणि नवीन मोठ्या बाजारपेठांमधील प्रवेशामुळे त्यांचे मोठे फायदे होतात, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.