हल्लेखोरांना कधी अटक होणार? आरोपींना अटक करण्याची मागणी

कालिनाच्या श्री शिवनगर वस्तीतील हल्ला प्रकरण
crime
crimesakal media
Updated on

धारावी : सांताक्रूझ पूर्व (Santacruz east) विभागातील कालिनाच्या श्री शिवनगर वस्तीतील नागरिकांवर त्याच वस्तीतील काहींनी किरकोळ कारणावरून १७ आॅक्टोबर रोजी रात्री प्राणघातक हल्ला (deadly Human attack) केला होता. त्या प्रकरणातील आरोपींना ताबडतोब अटक (culprit arrest) करा, अन्यथा आंदोलन करू (strike warning), असा इशारा देण्यात आला आहे.

crime
उपचाराअभावी सर्पदंश झालेल्या गर्भवतीचा मृत्यू; जव्हार मधील संतापजनक घटना

सात दिवस उलटूनही हल्लेखोर तरुण अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. यामुळे वस्तीत भीतीचे व तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी लवकरात-लवकर आरोपींना अटक करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. १४ ते २५ वयोगटातील जवळपास ३५ ते ४० तरुणांनी हत्यारे घेऊन रात्रीच्या वेळेस कालिना श्री शिवनगर वस्तीत शिरून चार ते पाच तरुणांवर हल्ला केला. हा सर्व हिंसक थरार सीसी टीव्ही कॅमेऱ्यांमध्ये टिपला गेला आहे. वाकोला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना असून आरोपींवर भादंवि ३०७ व ३४ अशी कलमे लावण्यात आली आहेत.

"आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. जर पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक केली नाही, तर आम्ही आंदोलन करू."
- संदेश गायकवाड, मुंबई सचिव, जनता दल (सेक्युलर)

"अजून आरोपींना अटक झालेली नाही. आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. आरोपी सापडतील तेव्हा आम्ही माध्यमांना कळवू."
- सुनयना नटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकोला पोलिस ठाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com