esakal | Western Railway Security | रेल्वेकडे इन्फ्रारेड अलार्म प्रणाली, ड्रोन्स ठेवणार पाळत
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

भारतीय रेल्वेकडे इन्फ्रारेड अलार्म प्रणाली, ड्रोन्स ठेवणार पाळत

sakal_logo
By
ओमकार वाबळे

भारतीय रेल्वे विभागाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करत घुसखोरांना रोखणारी अलार्म प्रणाली, सात इन्फ्रा-रेड आधारित सीसीटीव्ही कॅमेरे तैनात केले आहे. रेल्वे सुरक्षेला गती देण्यासाठी '360 डिग्री कव्हरेज' सुनिश्चित करण्यात आलं आहे.

रेल्वे परिसरातील सुरक्षा कडक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याअंतर्गत भारतीय रेल्वेने सुरक्षा क्षेत्रात नवनवीन तांत्रिक बदल होत आहेत. अलीकडेच, पश्चिम रेल्वे विभागाने मुंबईच्या महालक्ष्मी येथील आरपीएफ झोनल आर्मरीत इन्फ्रारेड अलार्म प्रणालीचे उद्घाटन केले. तसेच रेल्वे क्रीडा मैदान, महालक्ष्मी येथे सर्व्हिलन्स ड्रोनचे पहिले उड्डाण सुरू केले. यापुढे रेल्वे विभाग ड्रोन्सद्वारे लक्ष्य ठेवणार आहे.

पश्चिम रेल्वे झोनच्या संरक्षण दल (आरपीएफ) विभागाला या तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे. यामुळे मुंबई उपनगरी विभागात भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा सामना करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरपीएफला मदत मिळणार आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित युजर इंटरफेस सॉफ्टवेअरसह कोणाचीही उपस्थिती शोधण्यासाठी रिअल टाइम आधारावर विश्लेषण केले जाते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, ती खोटे अलार्म टाळण्यासाठी पक्ष्यांना ओळखून फक्त माणसांचा डेटा देईल. यामुळे सिक्युरिटी सिस्टिममधील त्रुटी दूर होतील. जलदगतीने प्रतिसाद देणे तसेच नाईट व्हिजन क्षमतेसह 24 तास कव्हरेजसह देणे, या गरजांची पूर्तता आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे होणार आहे.

loading image
go to top