जेव्हा अजगरावर येते दोन आठवडे 'लॉकडाऊन' होण्याची वेळ, पुढील दीड ते दोन महिने होणार उपचार

मिलिंद तांबे
Friday, 23 October 2020

अजगरावर पुढील दीड ते दोन महिने उपचार करावे लागणार असल्याची माहिती रॉ संस्थेच्या रितू शर्मा यांनी दिली

मुंबई : पीव्हीसी पाईपमध्ये अडकल्याने अजगरावर दोन आठवडे "लॉकडाऊन" होण्याची पाळी आली. रॉ संस्थेच्या मदतीने प्राणी मित्रांनी 4 तासांच्या अथक प्रयासाने 7.5 फूट अजगरची सुटका केली. त्यात जखमी झालेल्या अजगरावर उपचार करण्यात आले.

 

मुंबईतील मुलुंड भागात ही घटना घडली असून पीव्हीसी पाईपच्या तुकड्यात दोन आठवड्यांपासून हा अजगर अडकला होता. हा अजगर जिवंत असल्याचे लक्षात आल्यावर स्थानिकांनी तातडीने रॉ संस्थेशी संपर्क केला. त्यावेळी पाईपच्या तुकड्यात अडकल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती स्थानिकांनी रॉ संस्थेच्या स्वयंसेवकाना दिली.

महत्त्वाची बातमी : एकनाथ खडसेंचं पुनर्वसन कसं करणार? NCP प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलांनी दिलं उत्तर

रॉ संस्थेचे स्वयंसेवक तातडीने घटनास्थळी पोहोचले. या ठिकाणी अडकलेल्या 7.5 फूट लांबीच्या जखमी 'इंडियन रॉक पायथन' जातीच्या अजगराला रॉ संस्थेच्या स्वयंसेवकांनी वन विभागाच्या मदतीने मुलुंड कॉलनीतुन रेस्क्यू करण्याचे प्रयत्न सुरू केले. अनिल भालेराव, जोकीम नाईक, ओम्सी पारा आणि रितिक जयस्वाल यांनी अजगराला यशस्वी रेस्कू केले. 

रेस्कू करणाऱ्या टीमला या अजगराच्या शरीरात पीव्हीसी पाईपचा तुकडा घुसल्याचे दिसले. अजगर फुगल्याने त्याच्या त्याच्या शरीराला लोखंडी घट्ट बसला होता. त्यामुळे अजगराच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या. शेवटी कटरने काळजीपूर्वक पाईप कापून काढण्यात आला. त्यानंतर तातडीने जखमी अजगराला डॉ.रीना देव यांच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

अजगरावर पुढील दीड ते दोन महिने उपचार करावे लागणार असल्याची माहिती रॉ संस्थेच्या रितू शर्मा यांनी दिली. 

indian rock python rescued by raw who was stuck in pvc pipe for two weeks


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian rock python rescued by raw who was stuck in pvc pipe for two weeks