esakal | एकनाथ खडसेंचं पुनर्वसन कसं करणार? NCP प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलांनी दिलं उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

एकनाथ खडसेंचं पुनर्वसन कसं करणार? NCP प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलांनी दिलं उत्तर

पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील यांना एकनाथ खडसे यांच्या पुनर्वसनाबाबतचा प्रश्न विचारला गेला

एकनाथ खडसेंचं पुनर्वसन कसं करणार? NCP प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलांनी दिलं उत्तर

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : एकनाथ खडसे यांचा उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दुपारी दोन वाजता प्रवेश होणार आहे. स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांचा NCP पक्षप्रवेश होणार आहे. उद्याच्या कार्यक्रमासाठी एकनाथ खडसे आज थेट हेलिकॉप्टरमधून मुंबईत दाखल झालेत. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडली. महाराष्ट्र विधानपरिषद पदवीधर निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पक्षांतर्गत प्राथमिक चर्चा झाली असं जयंत पाटील यांनी सांगितलं. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील यांना एकनाथ खडसे यांच्या पुनर्वसनाबाबतचा प्रश्न विचारला गेला. खरंतर एकनाथ खडसे यांच्यासारखा जेष्ठ नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार म्हंटल्यावर त्यांना पक्षाकडून कोणती जबाबदारी, कोणतं पद किंवा कोणतं खातं दिलं जाणार याबाबत जोरदार चर्चा सुरु झाली. आज पत्ररकरांशी बोलताना जयंत पाटील यांना हाच प्रश्न विचारण्यात आला.

महत्त्वाची बातमी "यापुढे कोणत्याही पत्रकार परिषदेत माझं नाव घेतलं तर याद राखा", दमानिया यांचा खडसेंना इशारा

यावर जयंत पाटील म्हणाले की, खडसेंच्या पुनर्वसनाबाबत शरद पवार योग्य निर्णय घेतील. याबद्दल कोणत्याही अफवा पसरवल्या जाऊ नयेत. ज्यावेळेस असे प्रवेश करण्याचे ठरविले जातात त्यावेळेस हे निर्णय होत असतात. त्यामुळे एकनाथ खडसे यांना कोणतं खातं किंवा पद कसं द्यायचं याबाबद शरद पवार काय निर्णय घेतायत याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. 

दरम्यान उद्या एकनाथ खडसे यांच्यासोबत धुळे, जळगाव आणि नंदुरबारमधील काही लोकं राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती माध्यमांना दिली आहे. 

role of eknath khadase in NCP will be decided by sharad pawar says jayant patil

loading image