भारताची पहिलीवहिली स्वदेशी मशीनपिस्तुल विक्रमी वेळेत तयार; ले.कर्नल प्रसाद बनसोड यांची कामगिरी

कृष्ण जोशी
Sunday, 17 January 2021

अस्मी ही भारताची पहिलीवहिली स्वदेशी मशीनपिस्तुल (मशीनगन प्रमाणे गोळ्या झाडणारी) बनवण्याची कामगिरी नागपूरच्या ले. कर्नल प्रसाद बनसोड यांनी चार महिन्यांच्या विक्रमी वेळेत केली आहे.

मुंबई  ः अस्मी ही भारताची पहिलीवहिली स्वदेशी मशीनपिस्तुल (मशीनगन प्रमाणे गोळ्या झाडणारी) बनवण्याची कामगिरी नागपूरच्या ले. कर्नल प्रसाद बनसोड यांनी चार महिन्यांच्या विक्रमी वेळेत केली आहे. अत्यंत स्वस्त आणि अत्याधुनिक अशा या मशीनपिस्तुलचा सेनादलांना उपयोग होईलच पण ती निर्यातही करता येईल.  महू च्या इन्फंट्री स्कूलमधील बनसोड यांनी पुण्याच्या आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (एआरडीई) च्या सहकार्याने हे मशीनपिस्तुल बनवले आहे. 

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा 

मेटल थ्री डी प्रिंटिंग तंत्राने बनवलेल्या या मशीनपिस्तुलमध्ये उच्च दर्जाचे अॅल्युमिनिअम आणि कार्बन फायबर वापरण्यात आले आहे. आठ इंची बॅरल (नळकांडे) असलेल्या या मशीनपिस्तुलमध्ये 33 गोळ्या झाडू शकणारे मॅगझिन आहे. त्यामुळे यातून मशीनगनप्रमाणे स्वयंचलित पद्धतीने गोळ्या झाडता येतील. 

मॅगझिन व गोळ्यांशिवाय रिकाम्या बंदुकीचे वजन दोन किलो आहे. आकाराने छोटी अशी ही मशीनपिस्तुल हाताळणीस सोपी असल्याने ती सर्व प्रकारच्या सैनिकांना अगदी हवाईदल, रणगाडे यातील सैनिक, नाविक तसेच केंद्र व राज्य सरकारी पोलिस, व्हीआयपी संरक्षणाचे काम करणारे कमांडो आदींसाठी सोयीस्कर ठरेल. या मशीनपिस्तुलची किंमत फक्त पन्नास हजार रुपये असल्याने ती निर्यातही करता येईल अशी अपेक्षा आहे.

Indias first indigenous machine pistol made in record time by Lt. Col. Prasad Bansod

--------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indias first indigenous machine pistol made in record time by Lt. Col. Prasad Bansod