Textile Recycling : फेकलेल्या कपड्यामधून बनताहेत गृह्उपयोगी वस्तू; देशातील पहिला प्रकल्प कार्यान्वित
Smart City India : नवी मुंबई महापालिकेने देशातील पहिला ‘रिटेक्टाइल फॅसिलिटी’ प्रकल्प सुरू करून कचऱ्यातील कपड्यांवर पुनर्प्रक्रियेचा मार्ग खुला केला आहे. या उपक्रमात तयार साहित्य विक्रीसाठी बाजारात आले आहे.
नवी मुंबई : घराघरांतून कचऱ्यात गोळा होणाऱ्या कपड्यांचा प्रश्न मुंबई महापालिकेने सोडवला आहे. कपड्यांवर पुनर्प्रक्रिया करणारा देशातील पहिला प्रकल्प येथे कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पात तयार होणारे विविध साहित्य आता बाजारात विक्रीसाठी सज्ज झाले आहे.