INS Mangrol
sakal
- नितीन बिनेकर
मुंबई - समुद्राच्या कुशीत दडलेल्या पाणबुड्यांचा शोध घेऊन संभाव्य धोका रोखण्यासाठी भारतीय नौदलाला नवे सामर्थ्य मिळाले आहे. अत्याधुनिक सोनार, टॉर्पेडो आणि स्वदेशी पाणबुडीविरोधी यंत्रणांनी सज्ज असलेल्या ‘आयएनएस मंगरोल’ या युद्धनौकेचा सोमवारी मुंबईतील नौदल गोदीत भारतीय नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला.
उथळ समुद्रातील मोहिमांसाठी विशेषतः तयार केलेल्या या युद्धनौकेच्या बांधणीत ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईसह देशातील महत्त्वाची बंदरे आणि किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी नौदलाची क्षमता अधिक बळकट होणार आहे.