लसीकरण झालेल्या नागरिकांना इंडिगोकडून स्पेशल डिस्काऊंट

Indigo airline
Indigo airline sakal
Summary

इंडिगो एअरलाइन (Indigo Airline) कोरोना (Corona) लसीकरण केलेल्या प्रवाशांसाठी प्रवासी तिकिट दरात १०% सूट ( 10 % Discount on fare) देत आहे. ज्या प्रवाशांनी बुधवारपासून कोविड लशींच्या एक किंवा दोन मात्रा (Corona Vaccination) घेतल्या आहेत त्यांच्यासाठी ही खास ऑफर इंडिगोकडून देण्यात येणार आहे.

मुंबई : इंडिगो एअरलाइन (Indigo Airline) कोरोना (Corona) लसीकरण केलेल्या प्रवाशांसाठी प्रवासी तिकिट दरात १०% सूट ( 10 % Discount on fare) देत आहे. ज्या प्रवाशांनी बुधवारपासून कोविड लशींच्या एक किंवा दोन मात्रा (Corona Vaccination) घेतल्या आहेत त्यांच्यासाठी ही खास ऑफर इंडिगोकडून देण्यात येणार आहे. देशात अशी सुविधा देणारी इंडिगो ही एकमेव एअरलाइन आहे. या सेवेचा लाभ फक्त १८ वर्षांवरील लसीकरण केलेल्या प्रवाशांनाच मिळणार आहे. तसंच ज्या प्रवाशांनी विमानतळावर लसीकरण केलं आहे आणि बुकिंग करतावेळी जे देशात होते अशांनाच या सेवेचा लाभ घेता येणार आहे. अशी माहिती इंडिगोकडून देण्यात आली आहे. (Indigo Airline Offers special discount on fare for vaccinated Passenger)

ज्या प्रवाशांनी बुकिंगवेळी या सेवेचा लाभ घेतला आहे त्या लाभार्थ्यांना राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून अधिकृत कोविड १९ लसीकरणाचं प्रमाणपत्र देण्यात येईल.तसंच प्रवाशांना बोर्डिंग गेटवर आरोग्य सेतू अॅपवर नोंदणी केलेला लसीकरण प्रमाणपत्रंही दाखवता येईल.अशी माहिती इंडिगोच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.

Indigo airline
गणेश नाईक नाराज? सिडको घेराव आंदोलनाकडे फिरवली पाठ

''देशातील एक मोठी एअरलाइन म्हणून राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत काहीतरी योगदान देणं ही आमची जबाबदारी आहे.या मोहिमेत अनेकांनी सहभाग घ्यावा हाच आमचा दृष्टीकोन आहे.या सेवेमुळं प्रवाशांना त्यांच्या लसीकरणात बळकटी मिळेल तसंच त्यांना इंडिगोच्या माध्यमातून वाजवी दरात सुखरुप प्रवास करता येईल.प्रवाशांना विमानप्रवासात कोणताही त्रास न होता त्यांना वेळेवर सुविधा देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत".अशी माहिती इंडिगो एअरलाइनचे अधिकारी संजय कुमार यांनी दिली आहे.मर्यादित प्रवाशांची नोंद असलेल्या यादीनुसारच या सवलतीच्या सेवेचा लाभ घेता येणार आहे.या सेवेचा लाभ इंडिगोच्या वेबसाईटवरुनच घेता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com