स्वप्नपूर्ती संकुलात "वॉटरफॉल"; सिडकोच्या निकृष्ट बांधकामाचा फटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संकुलाच्या संरक्षक भिंतीतून अक्षरशा पाण्याचे धबधबे सुरू आहेत. संकुलाला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे संकुलातील रहिवाश्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

नवी मुंबई : गेल्या दोन दिवसंपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका नवी मुंबईतील स्वप्नपूर्ती या नवनिर्मित गृह संकुला बसला असून या संकुलात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सकाळ पासूनच पावसाचा जोर वाढल्याने संकुलात पाणीच पाणी झाले आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संकुलाच्या संरक्षक भिंतीतून अक्षरशा पाण्याचे धबधबे सुरू आहेत. संकुलाला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे संकुलातील रहिवाश्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

सिडकोने चार वर्षांपूर्वी खारघर सेक्टर ३६ मध्ये या संकुलाची निर्मिती केली. साधारणतः तीन वर्षांपूर्वी रहिवाश्यांना घराचा ताबा देण्यात आला. मात्र केवळ दोन वर्षातच घरांना गळती लागली आहे. घरांच्या सिलिंग,भिंती, खिडक्यांच्या कमानीतून पाणी झिरपत आहे. यामुळे रहिवाशी त्रस्त झाले आहेत. आता तर संकुलाच्या संरक्षक भिंतीतून पाण्याचे धबधबे वाहू लागले आहेत. यामुळे रहिवाश्यांना घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून रहिवाश्यांनी आपल्या तक्रारींचा पाढा सिडको समोर वाचला,अनेक तक्रारी केल्या,बौठका केल्या ,मात्र यावर काहीही कारवाई झालेली नाही.सिडकोचे अधिकारी संकुलात अनेकदा येऊन पाहणी करून गेले मात्र समस्यांवर काहीही तोडगा निघाला नाही.यामुळे त्रासलेल्या रहिवाश्यांनी सिडको विरोधात आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: inferior quality of CIDCO affects home township