विरारमध्ये आढळला जखमी अवस्थेतील 'ब्राऊन बुबी' पक्षी; उपचारासाठी पक्षीमित्रांची रुग्णालयात धाव

विरारमध्ये आढळला जखमी अवस्थेतील 'ब्राऊन बुबी' पक्षी; उपचारासाठी पक्षीमित्रांची रुग्णालयात धाव


विरार -  विरार मध्ये दुर्मिळ जातीच्या पक्षाची कावळ्याच्या तावडीतून सुटका करून, पक्षीमित्रांनी त्याला जिवनदान दिले आहे. सुटका केलेला पक्षी हा  'ब्राऊन बुबी' या जातीचा दुर्मिळ पक्षी असल्याचे पक्षी मित्रानी सांगितले आहे. 

हा पक्षी कोलंबिया साउथहिस्ट अमेरिका येथील आहे. पण प्रजनन काळात हे पक्षी प्रवास करण्यास निघत असतात. याच प्रवासात तो चुकून आपल्या देशात आला असावा असा अंदाज पक्षीमित्रांनी व्यक्त केला आहे. 

हा पक्षी जखमी अवस्थेत विरार पूर्व जीवदानीच्या डोंगर परिसरात पडलेला होता. त्याला कावळे मारत असताना काही लोकांनी या पक्षाला वाचवले. आणि पक्षी मित्रांना बोलावून त्यांच्या स्वाधिन केले. पक्षाला रुग्णालयात उपचारासाठी पाठविले आहे. हा पक्षी पहिल्यांदाच या परिसरात आला असून तो दुर्मिळ असल्याचे पक्षीमित्रांनी सांगितले.

--------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com