Innovation Mahakumbh 2.0
sakal
मुंबई - श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (एसएनडीटी) स्थापनेला ५ जुलै रोजी १११ वर्षे पूर्ण होत असून त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या पुणे संकुलात इनोव्हेशन महाकुंभ २.० चे आयोजन करण्यात आले आहे. यात विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या १११ विद्यार्थिंनी आपल्या नवसंकल्पनांमधून साकारलेल्या स्टार्टअप्सचे सादरीकरणे केले जाणार असल्याची माहिती आज कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी दिली.