Vasai agriculture News: केळी-फुलांनंतर वसईत सफरचंदाची बाग फुलली; आठ गुंठ्यात ५० झाडांमधून शेतकऱ्यांना नवा पर्याय

केळी, फुले, भाजींसाठी प्रसिद्ध वसईत आंबोडे येथील शेतकरी मनोहर भोईर यांचा धाडसी प्रयोग; दमट हवामानात एना व हरिमन ९९ जातीच्या ५० सफरचंद रोपांना लागली फळधारणा
Agriculture Graduates Help Father Turn 8 Gunthas into a Fruit Paradise

Agriculture Graduates Help Father Turn 8 Gunthas into a Fruit Paradise

Sakal

Updated on

विरार : वसई तालुका हा निसर्गसंपन्नतेने नटलेला तालुका आहे. एका बाजूला प्रशस्त असा समुद्र किनारा तर दुसऱ्या बाजूला डोंगर या दोन्हीच्या मध्ये भाजी पाला ,येथील प्रसिद्ध केळी .जाई जुई,मोगरा चाफा यांची केलेली लागवड आणि याठिकाणचे मासे प्रसिद्ध आहेत. आता वसईच्या पूर्वपट्टीतील आंबोडे गावातील शेतकरी मनोहर भोईर यांनी आपल्या आठ गुंठे जागेत सफरचंदाची लागवड केली असून या झाडांना फळे हि लागली आहेत. मुळात थंड हवेत येणारी सफरचंद आता वसई सारख्या दमट हवामानात हि होऊ लागल्याने येथील शेतकऱ्यांना एक वेगळा पर्याय उपलब्ध झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com