मुंबई - काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात चिंता व्यक्त होत असताना, भारतीय नौदलाने स्वदेशी बनावटीच्या ‘आयएनएस सुरत’वरून समुद्र सपाटीखालील लक्ष्यावर अचूक क्षेपणास्त्र हल्ला केला. यातून भारताने आपली सागरी ताकद आणि सामरिक सज्जता पुन्हा अधोरेखित केली आहे.