Inside Story : गेल्या २० वर्षांत 'या' ३ व्हायरसमुळे जगात आली महामारी

Inside Story : गेल्या २० वर्षांत 'या' ३ व्हायरसमुळे जगात आली महामारी

मुंबई : कोरोनाचा संसर्ग जगभरात शिखरावर आहे. कोरोनामुळे तब्बल ८० हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरस पसरण्याचं प्रमुख कारण म्हणजे वटवाघूळ असल्याचं बोललं जातंय. चीनमध्ये लोकांनी वटवाघळं खाल्ल्यामुळे त्यांच्या शरीरात असणारे कोरोना विषाणू  मानवी शरीरात गेले आणि जगभरात याचा संसर्ग झाला असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आपल्या देशातील प्रमुख शहरं असणाऱ्या मुंबईत पुण्यात कोरोना संसर्गाचा धोका वाढताना पाहायला मिळतोय. अशात आज आम्ही तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहोत. ही माहिती आहे गेल्या २० वर्षात जगात ३ व्हायरसमुळे कशी रोगराई आणि महामारी पसरली याबाबत.

कोणते आहेत हे व्हायरस:

  • २००२ साली चीनमध्ये 'सार्स' नावाच्या व्हायरसमुळे महामारी पसरली होती. याचा संसर्ग ९१ हजार लोकांना झाला होता तर ३००० पेक्षा जास्त लोकांचा यामुळे मृत्यू झाला होता.
  • २०१२-२०१७ दरम्यान 'मर्स' नावाच्या व्हायरसचा प्रादुर्भाव झाला होता. याचा संसर्ग २५०० लोकांना झाला होता तर यामुळे ९०० लोकांचा मृत्यू झाला होता.
  • आता डिसेंबर २०१९ पासून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात होतोय. याचा संसर्ग जगभरात तब्बल १५ लाख लोकांना झालाय तर यात ९० हजार पेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावला आहे.

सार्स महामारी -SARS (Severe Acute Respiratory Syndrome)

२००२ मध्ये पसरलेल्या या महामारीमध्ये रुग्णाला रोगाचे लक्षणं दिसायला २ ते ११ दिवसांचा कालावधी लागत होता. एखादी माशी जर विष्ठेवर बसून नंतर कुठल्या अन्नावर बसत असेल तर हे अन्न खाल्ल्यामुळे हा रोग होत होता. ताप, सर्दी, कोरडा खोकला, डोकेदुखी, डायरिया, श्वास घेण्यास त्रास ही या आजाराची लक्षणं होती.

या रोगात लिव्हर किंवा किडणी खराब होण्याची शक्यता होती. या रोगाच्या २० ते ३० टक्के रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज पडत होती. या रोगाचा मृत्युदर ९.६ टक्के होता.

मर्स व्हायरस MERS ( Middle East Respiratory Syndrome )  

२०१२ साली आलेला मर्स व्हायरसपासून होणारा रोगही सार्स सारखाच दूषित अन्न  खाल्यामुळे पसरत होता. या रोगाची लक्षणं २ ते १३ दिवसांमध्ये दिसून येत होती. सर्दी, ताप, खोकला, न्यूमोनिया, किडणी खराब होणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी या रोगाची लक्षणं होती. यात बहुतांश रुग्णांचा मृत्यू न्यूमोनिया झाल्यामुळे झाला होता. या रोगात मृत्युदर ३४.४ टक्के असा होता.

कोरोना व्हायरस:

सध्या जगात थैमान घालत असलेल्या नॉवेल कोरोना व्हायरसमुळे होणारया रोगाचं नाव COVID-19 असं आहे. या रोगाची लक्षणं दिसायला १४ दिवसांचा कालावधी लागतो. ताप, सर्दी, खोकला, कफ, डोकेदुखी, न्यूमोनिया, श्वास घेण्यास त्रास होणे ही आजाराची प्रमुख लक्षणं आहेत. जगभरात या रोगाची १५ लाखांपेक्षा जास्त लोकांना लागण झाली आहे. तर ९० हजार पेक्षा लोकांचा मृत्यू झाला आहे.

inside story these three virus shook world in last twenty years

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com