धक्कादायक ! पालिका आणि पोलिसांमध्ये भांडण, दीड तास मृत व्यक्ती रस्त्यावरच पडून...

धक्कादायक ! पालिका आणि पोलिसांमध्ये भांडण, दीड तास मृत व्यक्ती रस्त्यावरच पडून...

शिवडी : वडाळा पूर्व गणेश नगर येथील रस्त्यावरून चालतांना अचानक एक प्रवासी रस्त्यावर कोसळून पडला. काही कळण्याच्या आतच येथील स्थानिक नागरिकांमध्ये अनेकांच्या मनात कोरोना बाधित रुग्ण असल्याची चर्चा सुरू झाल्याने एकच खळबळ माजली होती.

सदरील घटनेची माहिती मिळताच वडाळा पोलिसांना आणि एफ उत्तर विभागाच्या संबंधीत अधिकाऱ्यांना याबाबत कळविण्यात आले. मात्र हे काम आमचे नाही म्हणत पोलिसांनी पालिकेकडे तर पालिकेने पोलिसांकडे बोट दाखवले. या टोलवाटोलवीमुळे तब्बल दीड तास मृत व्यक्ती रस्त्यावर पडून राहिल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवार, (ता.9) रोजी वडाळ्यात घडला आहे. अखेर वडाळा पोलिसांनीच पुढाकार घेऊन या मृत व्यक्तीस केईएम रुग्णालयात दाखल केले अशी माहिती नगरसेविका स्मिता गावकर यांनी दिली आहे. 

वडाळा पूर्व येथील शांतीनगर परिसरात राहणारा अनिल म्हात्रे आपल्या वयक्तिक महत्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडला होता. रखरखत्या उन्हात वडाळ्यातील गणेशनगर येथील रस्त्यावरून चालताना अचानक तो कोसळून रस्त्यावर पडला. लॉकडाऊन असल्याने रस्त्यावर प्रवाशांची वर्दळ नव्हती. तरीही एक कोरोना रुग्ण रस्त्यावर पडला असल्याची बातमी वाऱ्यासारखी विभागात पसरली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नगरसेविका स्मिता गावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी याची माहिती पोलीस व महापालिका एफ उत्तर विभागाचे आरोग्य अधिकारी निलेश पालव यांना दिली.

माहिती मिळाल्यानंतरही पोलिस व पालिका हे एकमेकांवर जबाबदारी झटकत होते. त्यामुळे तब्बल दीड तास हा मृत व्यक्ती रस्त्यावरच पडून राहिला होता. अखेर पोलिसांनी 108 क्रमांकाची रुग्णवाहिकेला बोलावून या मृत व्यक्तीस केईएम रुग्णालयात दाखल केले आहे. हा रुग्ण कोणत्या कारणास्तव रस्त्यावर पडला याबाबत कोणतीही माहिती पालिका व पोलिसांकडे उपलब्ध नसल्याने हा कोरोना बाधित रुग्ण होता की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

conflict between BMC and police resulted in not getting medical help to mumbaikar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com