CM Eknath Shinde : ऐरोली कटाई नाका रस्ता प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे ऐरोली कटाई नाका रस्ता प्रकल्प विस्तारीत पायाभूत सुविधा प्रकल्पाअंतर्गत हाती घेण्यात आलेला आहे.
Inspection of Airoli Katai Naka Road Project by CM Eknath Shinde mumbai politics
Inspection of Airoli Katai Naka Road Project by CM Eknath Shinde mumbai politicssakal
Updated on

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे ऐरोली कटाई नाका रस्ता प्रकल्प विस्तारीत पायाभूत सुविधा प्रकल्पाअंतर्गत हाती घेण्यात आलेला आहे. सदर प्रकल्पाचा भाग एक मधिल बोगदयाचे व रस्त्याचे बांधकाम हे ऐरोली पुल ते ठाणे बेलापूर रस्ता पर्यंत आहे.

या प्रकल्पाची सर्वसाधारण भौतिक प्रगती 66.8 टक्के तर प्रकल्पाची सर्वसाधारण आर्थिक प्रगती 65.85 टक्के झाली असून, शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पाला भेट दिली आहे. भाग एक ठाणे बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार 3.43 किलोमीटरचा आहे. तर भाग दोन ऐरोली पुल ते ठाणे बेलापूर रस्ता 2.57 किलोमीटरचा आहे.

सद्य:स्थितीत प्रवाशांना महापे किंवा ठाणे येथून मार्ग काढून जावे लागत आहे. मात्र, या प्रकल्पामुळे कल्याण- डोंबिवली आणि नवी मुंबई मधील अंतर ७ कि.मी. ने कमी होईल त्यामुळे वेळेत २० ते २५ मिनिटांची बचत होईल. सदर प्रकल्पामुळे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना मोठया प्रमाणात फायदा होईल.

प्रकल्पाची सद्यस्थिती

सदर प्रकल्पांतर्गत पारसिक डोंगरामध्ये प्रगतीपथावर असलेल्या डाव्या बाजूच्या बोगद्याचा डे-लाईटसाठी शेवटचा ब्लास्ट मुख्यमंत्री यांचे हस्ते 27 जानेवारी रोजी पार पडली आहे. यावेळी एमएमआरडीए आयुक्त एस सी आर श्रीनिवास आणि एमएमआरडीएचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com