वसई-विरार शहरावर `तिसरा डोळा`; महत्त्वाच्या ठिकाणी बसवले 145 कॅमेरे 

प्रसाद जोशी
Friday, 6 November 2020

गुन्हा करून गुन्हेगार पळाल्यानंतर त्याचा त्वरित तपास लागावा, त्यांच्या मुसक्‍या आवळून गुन्हेगारीला आळा घालता यावा, म्हणून "एक कॅमेरा शहरासाठी' या योजनेतून वसई विरार शहरात एकूण 145 सीसी टीव्ही लावण्यात आले आहेत. ही योजना वसई-विरारमध्ये राबवण्याचा आदेश आयुक्त सदानंद दाते यांनी दिले आहेत.

वसई  ः गुन्हा करून गुन्हेगार पळाल्यानंतर त्याचा त्वरित तपास लागावा, त्यांच्या मुसक्‍या आवळून गुन्हेगारीला आळा घालता यावा, म्हणून "एक कॅमेरा शहरासाठी' या योजनेतून वसई विरार शहरात एकूण 145 सीसी टीव्ही लावण्यात आले आहेत. ही योजना वसई-विरारमध्ये राबवण्याचा आदेश आयुक्त सदानंद दाते यांनी दिले आहेत, त्यानुसार शहरात कॅमेरे लावण्यात आले आहेत. याचे उद्‌घाटन उपयुक्त संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

कोरोना दिवाळी! सण साजरा करण्यासाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

वसई, वालीव, नालासोपारा, नवघर माणिकपूर, अर्नाळा सागरी, विरार, तुळींज सात पोलिस ठाणे हद्दीतील दुकाने, हॉटेल, बॅंक, पेट्रोलपंप, सोसायटी, ऑफिस, आस्थापना व इतर संस्था येथे नागरिकांची भेट घेऊन त्यांना या योजनेचे महत्त्व पटवून देण्यात आले. समाधान फाऊंडेशन, हनुमान मंदिर, टेम्पो असोसिएशन, कौल फाऊंडेशन, केजीएन यांच्यासह अन्य संस्थांनी कॅमेरा बसवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

दिवाळीसाठी नागरिक उत्साही, मात्र तडजोडीनेच यंदाची दिवाळी करणार साजरी

वसई तालुक्‍यात औद्योगिक व नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात असून सराफांची दुकाने लुटणे, घरफोडी आणि त्यातच धूम स्टाईलने येणारे सोनसाखळी चोर यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आरोपींना वेळीच जेरबंद करता यावे म्हणून एक कॅमेरा सुरक्षेचा उपक्रम पोलिसांनी हाती घेतला व त्याला वसईतील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या उपक्रमामुळे गुन्हेगारीवर मात करण्यास मदत होईल, असे मत पोलिस दलाकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

 

गुन्हेगारीवर प्रतिबंध व गुन्ह्याचा तपास करताना वसई-विरार शहरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यामुळे तपासाला निश्‍चितच उपयोगी ठरतील. शहरातील मुख्य तसेच अंतर्गत मार्गावर, वर्दळीच्या ठिकाणी कॅमेरे असल्याने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहेत. अद्याप कुठे सीसी टीव्ही लावावेत याचाही विचार सुरू आहे. 
- संजय पाटील- उपायुक्त, वसई. 

       

Installed 145 CCTVs in Vasai Virar city

(संपादन ः रोशन मोरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Installed 145 CCTVs in Vasai Virar city