अंमली पदार्थांचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस; 'एनसीबी'ची एकाला अटक

तुषार सोनवणे
Tuesday, 1 September 2020

बॉलिवूडमधील नशेखोरीच्या तपास करण्यासाठी अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने धडक करावी करून आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आणले आहे.

मुंबई - बॉलिवूडमधील नशेखोरीचा तपास करण्यासाठी अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने धडक करावी करून आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आणले आहे.

'सत्ता विसर्जनाचा मुहूर्त त्यांनाच विचारून काढतो'; देवेंद्र फडणवीसांचा स्वकीयांनाच टोला

एनसीबीने मुंबईत ठीकठीकणी छापे टाकून काही माहिती गोळा केली होती. त्यानुसार गोव्यातही छापे मारण्यात आले होते. या सर्व छापेमारीवरून मिळालेल्या माहितीनुसार गोव्यातील हणबुजे येथील हॉटेलमध्ये कार्यरत असणाऱ्या अहमद नावाच्या व्यक्तीला अंमली पदार्थ नियंत्रक पथकाने अटक केली आहे. अहमद बॉलिवूडमधील अनेक बड्या हस्तींना ड्रग्स पुरवण्याचे काम करतो असा एनसीबीला संशय आहे

मोठी बातमी! राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूक सेवेला हिरवा कंदील; उद्यापासून सुरू होणार बुकिंग
 

याप्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचे समोर आले आहे. अमेरिका आणि कॅनडातून आलेले अंमली पदार्थ मुंबई, गोवा तसेच बंगळूरू पर्यंत पोहचवण्याचे काम या रॅकेटच्या माध्यमातून केले जात असल्याचा संशय आहे. अहमदसुद्धा या रॅकेटचा महत्वाचा सुत्रधार मानला जात आहे. त्याला गोव्यातील कळंगूट येथून अटक करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: International chemical praduct racket unfolds; NCB arrests one