Mumbai: डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा! ९१११ महिलांनी रचला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, सांगलीचा विक्रम मोडीत

Dombivli womens lezim world record: डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ९१११ महिलांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. त्यांनी सांगलीचा विक्रम मोडीत काढला आहे.
Dombivli world record

Dombivli world record

ESakal

Updated on

डोंबिवली: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीसह कल्याण तालुक्यातील ९ हजार १११ महिला आणि विद्यार्थींनीनी एकत्र येत सामुहिक लेझीम वादनात एक जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड करून डोंबिवलीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक लेझीम वादन स्पर्धेत रविवारी येथील श्री संत सावळाराम क्रीडा संकुल या क्रीडांगणामध्ये ठाणे जिल्ह्यातील शेकडो शाळांच्या विद्यार्थीनी आणि महिला भगिनी आदींनी एकत्र येत ९,१११ एवढ्या मोठ्या संख्येने सामूहिकपणे लेझीम वादनाचा वर्ल्ड रेकॉर्ड केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com