वज्रेश्वरी देवस्थानच्या भ्रष्टाचार प्रकरणी प्रथम दर्शनी चौकशी अहवाल सादर

दीपक हीरे
रविवार, 2 डिसेंबर 2018

वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी येथील सुप्रसिद्ध देवस्थान वज्रेश्वरी योगीनीदेवी संस्थानमध्ये नुकताच झालेल्या 3 करोड 22 लाख 85 हजार 658 रुपयाच्या अपहर प्रकरणी वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि अकलोली सहसंपूर्ण ठाणे जिल्हात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी येथील संघर्ष अभियानचे अध्यक्ष सुनील देवरे यांनी वज्रेश्वरी देवस्थान बाबत आणखी काही बाबी निदर्शनास आणून सहायक धर्मादाय आयुक्त यांच्याकडे चौकशी अर्ज केला होता. त्याचा प्रथम दर्शनी अहवाल मिळाला असून केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त ठाणे यांच्या कडून सांगण्यात आले आहे.   

 संघर्ष अभियान आणि ग्रामस्थ अशा विविध स्तरावर वज्रेश्वरी येथील विश्वस्त विरोधात तीव्र निषेध नोंदविला गेला होता, तसेच, या बरोबरच देवस्थानच्या जमिनींची विक्री, दानपेटी, दागिने, साडी चोळी, नारळ, आणि शारदीय व चैत्र नवरात्रोत्सवात होणारा खर्च या बाबत चौकशी होणे गरजेचे आहे. सदर सर्व प्रकार हा कल्पेश पाटील हे अध्यक्ष होण्या आधी स्थानिक विश्वस्त अविनाश राऊत हे अध्यक्ष पदी असताना हा भ्रष्टाचार का उघडकीस आला नाही किंवा सदर भ्रष्टाचार का झाकून ठेवण्यात आला. आदि विषयी देखील सखोल चौकशी करण्याची मागणी सुनील देवरे यांनी केली होती

दरम्यान, या बाबत सहायक धर्मादाय आयुक्त ठाणे यांनी निरीक्षक अशोक उंबरे याना चौकशी अधिकारी म्हणून नेमले होते. त्यात त्यांना देवस्थान बाबत बऱ्याच तक्रारींमध्ये तथ्य असल्याचे आढळून आले आहे. त्यात प्रथम दर्शनी संस्थान ने ज्या नोंदी ठेवायच्या असतात त्या नियमित प्रमाणात ठेवलेले नाहीत. तसेच कुठलीही मीटिंगमध्ये सदर विषयी नोंदी आढळून येत नाही व घेतल्या गेल्या नाहीत. संस्थेच्या कामकाज मध्ये खूप तफावत आढळून आली आहे. त्यामूळे या पाच वर्षात जो काही भ्रष्टाचार झाला अनियमित मिटिंग, दानपेटी नोंदी, सोन, या सर्व  घडा मोडी ना पाच ही विश्वस्त कारणी भूत असल्याचे उंबरे यांनी सांगितले असून येत्या दोन दिवसात अंतिम अहवाल सादर होणार आहे. त्यात आणखी काही प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता असून वेळ आल्यास वज्रेश्वरी देवस्थान तसेच गणेशपुरी येथील श्री भीमेश्वर सदगुरू नित्यानंद संस्थान येथेही अशाच प्रकारचे ग्रामस्थ कडून तक्रारी येत असल्याने प्रशासक नेमण्याचे हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

"वज्रेश्वरी देवस्थान येथे मी अध्यक्ष असताना ज्या चार एफडीबाबत  देवस्थानच्या चेकवर माझी सही दिल्या आहेत. मात्र मला हुबेहूब डुप्लिकेट कॉर्पोशन बँकेचे सर्टिफिकेट दाखविण्यात आली. तिची मी शहानिशा न केल्याने हा घोळ वाढत गेला. मनोज प्रधान यांनी अपहार करून संस्थेचा नुकसान केले आहे. आमच्या कालावधीत झालेले कृत खूप निदानिय असून आम्ही निष्काळजी पणा केला व आमचा  विश्वस्त मनोज प्रधान याच्या कडून  विश्वास घात करण्यात आला." 
- अविनाश राऊत, माजी अध्यक्ष, वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थान    

Web Title: Introducing the first face inquiry report in the corruption case of Vajreshwari Devasthan