इंटकच्या मागणीने कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय; कोव्हीडमुळे अनुपस्थित कर्मचाऱ्यांना कर्तव्य कालावधीत होणार गणती

सुजित गायकवाड - सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 July 2020

काँग्रेसच्या इंटक युनियनतर्फे जिल्हाध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या शिष्टमंडळाने बांगर यांची भेट घेऊन या कामगारांच्या मागण्या समजावून सांगितल्या. त्यानंतर बांगर यांनी हे परिपत्रक काढून कामगारांना दिलासा दिला आहे.

 नवी मुंबई : कोरानाच्या कर्तव्यावर असताना बाधा होऊन आजारी असल्यामुळे कामावर गैरहजर असलेल्या अनुपस्थितीत कर्मचाऱ्यांचा कालावधी यापूढे कर्तव्य कालावधी म्हणून गणला जाणार असल्याचे नवे आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसच्या इंटक युनियनतर्फे जिल्हाध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या शिष्टमंडळाने बांगर यांची भेट घेऊन या कामगारांच्या मागण्या समजावून सांगितल्या. त्यानंतर बांगर यांनी हे परिपत्रक काढून कामगारांना दिलासा दिला आहे. तसेच इंटकने केलेल्या ठोक मानधनावारील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत देणे, साप्ताहिक सुट्टी आदी मागण्यांनाही सकारात्मक प्रतिसाद देत मान्य करण्याचे आश्वासन सावंत यांना दिले. 

उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्या सोबतचा 'तो' खास फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा
 

कोविड 19 संसर्ग काळात चार महिन्यांच्या कालावधीत मनपा आरोग्य प्रशासन आणि आस्थापनेवरील अधिकारी कर्मचारी कोविड योद्धा म्हणून जीवावर उदार होऊन जनतेच्या सेवेत अहोरात्र कार्यरत आहेत. या काळात कोरोनाची लागण झाल्याने अनेकांवर उपचार सुरू असून काहींचा मृत्यूही झाला आहे. मात्र तरी प्रशासनाने काही तुघलकी निर्णय घेतल्याने मनपा आस्थापनेमध्ये नाराजी निर्माण झाली होती. आठवड्यात सात दिवस काम करण्याचे फर्मान जारी करण्यात आले होते. मुळात चार महिन्यांपासून मनपा अधिकारी कर्मचारी दिवसरात्र आठवडाभर राबत असून त्यांना या मोबदल्यात कोणतही अतिरिक्त वेतन सुविधा दिली जात नाही अथवा प्रोत्साहन भत्ता मिळत नाही. मात्र शहराच्या आरोग्य सुविधेसाठी कामगार आणि अधिकारी जीवावर उदार होऊन कार्यरत आहेत. या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण होऊ नये म्हणून इंटक मार्फत सतत आवाज उठवला जातो या अनुषंगाने रवींद्र सावंत, सचिव सिद्धार्थ चवरे आदी कामगार नेत्यांनी बांगर यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली.

धक्कादायक आकडा!  मुंबईत आतापर्यंत 'इतक्या' पालिका आणि पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा करून सकारात्मक प्रतिसाद देत आठवड्याचे सात दिवस उपस्थिती बंधनकारक केल्याच्या समस्येकडे लक्ष वेधले. कोरोना काळात सतत राबणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना आवश्यक आराम आणि स्वास्थ्य समस्या याबाबत बांगर यांना सविस्तर माहिती देण्यात आली. या सगळ्या समस्यांबाबत विस्तृत निवेदन आयुक्तांना सादर करण्यात आले. या निवेदनाची तातडीने दखल घेऊन आपल्या जारी केलेल्या आदेशामध्ये बदल करण्याचे सूतोवाच त्यांनी केल्याने मनपा प्रशासनामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

मुंबईतील लोकल सेवा कधी सुरु होणार? यावर राजेश टोपे म्हणतात, नागरिकांची मागणी रास्त...

पूर्वी पासून मनपा मध्ये काम करणाऱ्या ठोक मानधनावरील पालिकेतील कर्मचारी म्हणजे परिचारिका व इतर  विभागातील कामगारांना अल्प वेतनावर राबवून घेतले जात आहे. पुरेशा वेतन सुविधांपासून वंचित असताना मात्र नवीन भर्ती प्रक्रियेअंतर्गत मात्र भरघोस वेतन देण्याचे प्रयोजन केले आहे. याकडे आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले. सध्यस्थीतीत काम करणाऱ्या डॉक्टरांना मिळणारे वेतन दरमहा 75 हजार रुपये असून नव्याने येणाऱ्या मात्र दुप्पट वेतन दिले जाणार आहे. सर्वच पदांबाबत वेतनाच्या बाबतीत असाच निर्णय घेण्यात आला असून वेतन सुविधेतील तफावत आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. ही तफावत आयुक्तानी मान्य केली असून यामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: INTUC demand gave employees justice; Absent employees due to covid will be counted during the duty period