'शेतकऱ्यांना भडकावणाऱ्या आझमींची चौकशी करा'; भाजप नेत्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र

कृष्ण जोशी
Wednesday, 27 January 2021

शेतकरी आंदोलनाच्या आडून दिल्लीत हिंसक आंदोलन करणाऱ्यांना चिथावणी देणारे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी तसेच त्यांच्या सूत्रधारांची चौकशी करावी, अशी मागणी करणारे पत्र भाजप नेत्याने केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहले आहे

मुंबई - शेतकरी आंदोलनाच्या आडून दिल्लीत हिंसक आंदोलन करणाऱ्यांना चिथावणी देणारे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी तसेच त्यांच्या सूत्रधारांची चौकशी करावी, अशी मागणी करणारे पत्र आमदार अतुल भातखळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिले आहे. 

प्रजासत्ताक दिनी मंगळवारी दिल्लीत शेतकऱ्यांनी केलेल्या हिंसक आंदोलनात किमान 90 पोलिस जखमी झाले आहेत; तर त्याआधी मुंबईतील शेतकरी आंदोलनातील जाहीर सभेत आझमी यांनी शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही भातखळकर यांनी केला. 

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्या वाचा एका क्लिक वर

राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी काही विरोधी पक्ष शेतकऱ्यांची माथी भडकवण्याचे काम करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी मुंबईत झालेल्या शेतकरी आंदोलनातील जाहीर सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित होते. त्यांच्यासमोर अबू आझमी यांनी प्रक्षोभक भाषण करताना, देशात वादळ निर्माण करा, असे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. ही हवा तुम्हाला भस्मसात करून टाकेल, असा इशारा आझमी यांनी पंतप्रधान मोदी यांना भाषणात दिला होता, असे भातखळकर यांनी पत्रात म्हटले आहे.

--------------------

-( संपादन - तुषार सोनवणे )

Investigate Azmi who provoked farmers BJP leaders letter to Union Home Minister

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Investigate Azmi who provoked farmers BJP leaders letter to Union Home Minister