लष्करी अधिकाऱ्याला धमकी देणाऱ्या शिवसेना नगरसेवकाची चौकशी करा; उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश

सुनिता महामुणकर
Saturday, 2 January 2021

मालमत्तेसंबंधित वादात शिवसेना नगरसेवकाने धमकावल्याचा आरोप करणाऱ्या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत.

मुंबई  : मालमत्तेसंबंधित वादात शिवसेना नगरसेवकाने धमकावल्याचा आरोप करणाऱ्या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. तसेच मुंबई महापालिकेसह सर्व प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.

वडाळा येथील रहिवाशी असलेले निव्रुत्त लष्करी अधिकारी सुजीत आपटे यांनी न्यायालयात याचिका केली आहे. शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांच्याकडून जीवाला धोका आहे, त्यामुळे पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच त्यांची तक्रार आरएके पोलीस ठाण्यात दाखल करण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी केली आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

आपटे यांच्या भावाच्या जमिनीवर बेकायदेशीर पणे साईमंदिर बांधण्यात आले आहे. या बांधकामाला त्यांनी विरोध केला आहे. या मालमत्तेबाबत पौवर औफ एटर्नी त्यांच्याकडे आहे. सन 2017 मध्ये त्यांनी मुंबई महापालिकाकडे तक्रार केली होती. तक्रारीवर महापालिकेच्याकडून कारवाई करण्यात आली. मात्र आता पुन्हा तेथे मंदिर बांधण्यात आले. तसेच घोले आणि काही अधिकार्यांनी धमकवले असा याचिकेत दावा केला आहे. 

न्यायालयाने संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावली असून आरोपांवर खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मुंबई पोलिसांनी याबाबत चौकशी करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. तसेच याचिकादाराला आवश्यकता वाटल्यास पोलीस संरक्षण देण्याबाबतही निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले. याचिकेवर पुढील सुनावणी ता. 13 रोजी आहे.

Investigate the Shiv Sena corporator High Court orders police

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Investigate the Shiv Sena corporator High Court orders police

टॉपिकस