पत्नीची हत्या करून मृतदेह भरला पिंपात; ठाकूरवाडीच्या जंगलातील धक्कादायक प्रकार

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 30 July 2020

खालापूर तालुक्यातील मिळ ठाकूरवाडी जंगलात एका महिलेचा मृतदेह प्लास्टिक पिंपात भरून टाकल्याचे नवी मुंबईतील रबाळे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

 

खालापूर: खालापूर तालुक्यातील मिळ ठाकूरवाडी जंगलात एका महिलेचा मृतदेह प्लास्टिक पिंपात भरून टाकल्याचे नवी मुंबईतील रबाळे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. या घटनेतील आरोपीने स्वतः आपल्या पत्नीची हत्या केल्याचे मान्य केले आहे.  या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला नसल्याने आरोपी आणि मृत महिलेबाबत माहिती देण्यास पोलिसांनी असमर्थता दर्शवली.

दहावीत पास, पण कॅन्सरच्या परीक्षेत नापास; टाटा रुग्णालयातून परीक्षा देत 'तिने' मिळवले तब्बल 'इतके' गुण

रबाळे येथील पोलिस ठाण्याचे निरीक्षक उमेश गवळी यांना,  आरोपीने स्वतःच्या पत्नीचा खून केला असल्याचे सांगत तिचा मृतदेह खालापूर तालुक्यातील जंगलात प्लास्टिक पिंपात भरून साधारण 15 ते 20 फूट खोल ठिकाणी टाकल्याचे सांगितले. या घटनेची माहिती मिळताच गवळी यांनी पोलिस पथक आणि आरोपीला घेऊन घटनास्थळी गेले. तेथे मृतदेहाचा शोध घेणे अवघड झाल्याने खालापूर तालुक्यातील अपघातग्रस्त मदतीसाठी असलेल्या पथकाची मदत घेतली. या वेळी खोपोली पोलिस ठाण्याचे निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सतीश आसवर, अपघातग्रस्त मदत पथकाचे सदस्य विजय भोसले, अमोल कदम, मितेश शहा, सुनील पुरी, यासिन शेख यांनी महिलेचा मृतदेह शोधून  पोलिसांच्या स्वाधीन केला.

दहावीत पास, पण कॅन्सरच्या परीक्षेत नापास; टाटा रुग्णालयातून परीक्षा देत 'तिने' मिळवले तब्बल 'इतके' गुण

याप्रकरणी, रबाळे पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल होती.   पोलिस अधिकारी तपास करत आरोपीसह खोपोलीत आले होते. मृतदेह तपासण्यासाठी आम्ही त्यांना सहकार्य केले. त्यानंतर ते मृतदेह ताब्यात घेऊन निघून गेले, अशी माहिती खोपोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी दिली.

-------------------------------------------

Edited by Tushar Sonawane


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An investigation by the Rabale police in Navi Mumbai has revealed that the body of a woman was filled in a plastic pipe in the Thakurwadi forest in Khalapur taluka.