esakal | सुशांत सिंह मृत्यू प्रकरणः पोलिसांची बदनामीसाठी बॉट अप्लिकेशनचा वापर
sakal

बोलून बातमी शोधा

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणः पोलिसांची बदनामीसाठी बॉट अप्लिकेशनचा वापर

बनावट खात्यांची संख्या एक लाखांच्या पार

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणः पोलिसांची बदनामीसाठी बॉट अप्लिकेशनचा वापर

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई : महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांची काही जणांनी जाणीवपूर्वक बदनामी करण्यात आली होती. त्यासाठी बॉट अॅप्लिकेशनचा वापर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यासाठी वापरण्यात आलेल्या बनावट खात्यांची माहिती घेण्याचे काम सुरू असून ती एक लाखाहून अधिक असल्याचे तपासात उघड झाले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांवर चौफेर टीका झाली होती. सोशल मीडियावरूनही अनेक गोष्टी रंगवून सांगितल्या जात होत्या. महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांच्या बदनामीचं मोठं षडयंत्र रचलं गेल्याचं आता पुढे आले आहे. याप्रकरणात महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी तब्बल 80 हजार फेक अकाऊन्ट बनवण्यात आली असल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. पण आता या तपासणीत एक लाखांहून अधिक खात्यांचा वापर झाल्याचे पुढील तपासात निष्पन्न झाले आहे. त्यासाठी सात बॉट अप्लिकेशनचा वापर करण्यात आला असून एका बॉट अॅप्लिकेशनच्या हाय्याने सहा ते सात हजार सोशल मीडिया अकाउंट हाताळता येऊ शकतात.

सर्वात मोठी बातमी : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात CBI करणार नव्याने तपास, दुसरं पथक मुंबईत दाखल

त्यामाध्यमातून सोशल मिडियावर काही जणांनी मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकार विषयी चुकीची माहिती सादर केली. काही प्रसिद्धी माध्यमांनीही मुंबई पोलिसांवर विरोधात एक मोहीम चालवली. 16 जून सुशांतचा कुटुंबियांची विधानामध्ये देखील त्यांनी ही आत्महत्या असल्याचे म्हटले होते. त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलं पण कुटुंबातील सदस्य चौकशीसाठी आले नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले. आता या प्रकरणी सायबर पोलिसात फेक अकाऊन्ट उघडून बदनामी केल्या प्रकरणी आणि चुकीची माहीती सोशल मिडियावर टाकून दिशाभूल केल्याप्रकऱणी दोन वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

investigation in SSR case bots application used to tan image of mumbai police