esakal | सर्वात मोठी बातमी : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात CBI करणार नव्याने तपास, दुसरं पथक मुंबईत दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वात मोठी बातमी : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात CBI करणार नव्याने तपास, दुसरं पथक मुंबईत दाखल

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूसंदर्भात एम्सने ही आत्महत्या असल्याचा अहवाल दिल्यानंतर देखील याप्रकरणाचा तपास करणारी सीबीआय मात्र अद्याप तळ्यात मळयात असल्याचे दिसुन आले आहे.

सर्वात मोठी बातमी : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात CBI करणार नव्याने तपास, दुसरं पथक मुंबईत दाखल

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूसंदर्भात एम्सने ही आत्महत्या असल्याचा अहवाल दिल्यानंतर देखील याप्रकरणाचा तपास करणारी सीबीआय मात्र अद्याप तळ्यात मळयात असल्याचे दिसुन आले आहे. यामुळे याप्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचा विचार सीबीआयने सुरु केला आहे.

यामुळे दुस-या टप्प्यातील तपासासाठी सीबीआयचे पथक दिल्लीहून पुन्हा मुंबईत आले आहे. सुशांतच्या मृत्यूच्या तपासासाठी CBI च्या विशेष पथकाने सर्व संबंधितांची तीन-तीन वेळा चौकशी केली आहे. मुख्य आरोपी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांची चार दिवस सलग चौकशी झाली. मात्र त्यानंतरही सुशांतचा मृत्यू नेमका कसा झाला, याची कुठलीही ठोस माहिती सीबीआयच्या हाती लागलेली नाही. त्याचवेळी पथकाने कूपर रुग्णालयातून सुशांतसिंहच्या मृत्यूचा विस्तृत शवविच्छेदन अहवाल अर्थात व्हिसेराचाही अभ्यास केला. एम्सच्या डॉक्टरांकडे हा अहवाल सोपविण्यात आला. एम्सच्या डाॅक्टरांनीही सकृतदर्शनी ही आत्महत्या असल्याचेच निदान केले आहे. यामुळेच आता ठोस निर्णयापर्यंत येण्यासाठी सीबीआय वेगळ्या दृष्टीने तपास करणार आहे. त्यासाठीच पथकाचे दिल्लीहून मुंबईत आगमन झाले आहे. सीबीआयमधील सूत्रांनुसार, या प्रकरणात कुठल्याही निर्णयावर येण्याइतकी माहिती अद्यापही सीबीआयच्या हाती लागलेली नाही.

महत्त्वाची बातमी : मुंबई पोलिसांचा सनसनाटी खुलासा, उध्वस्त केलं चॅनल्सचं 'फेक TRP रॅकेट', रिपब्लिक टीव्हीचीही चौकशी

तपास सुरू असतानाच व्हिसेरा अहवालात एम्सने आत्महत्येचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळेच पथकासमोरील आव्हाने वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर एम्समधील डॉक्टरांशी सल्लामसलत करून पथक मुंबईत आले आहे. ते आता दुस-या टप्प्यातील तपास सुरू करीत आहेत. यामध्ये एम्सच्या डॉक्टरांनी व्यक्त केलेल्या आत्महत्येसंबंधीचा तपास सीबीआय पथक करणार आहे. दरम्यान, मुख्य आरोपी रिया चक्रवर्ती हिने सुशांतसिंहच्या पैशांचा गैरवापर केला, तसेच ते पैसे अन्यत्र वळवले, असा आरोप ठेवण्यात आला होता.

महत्त्वाची बातमी : फेक TRP स्कॅम : अर्णब गोस्वामी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना कोर्टात खेचणार

परंतु नव्या तपासात रियाने या पैशांचा गैरवापर केला की नाही, हे अस्पष्ट आहे. त्यामुळेच सध्या तरी रिया हीच सुशांतच्या मृत्यूला कारणीभूत आहे अथवा नाही, याच्या ठोस निर्णयावर सीबीआचे विशेष पथक आलेले नाही. त्यासाठीच या प्रकरणाचा दुस-या टप्प्यात नव्याने तपास सुरू केला जाईल, असे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले. त्यानुसार, पुन्हा एकदा नव्याने चौकशीला सुरुवात होणार आहे

loading image
go to top