"पीएसयू' फंडांकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला 

सकाळ न्यूज नेटवर्क 
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या आकर्षक मूल्यामुळे गुंतवणूकदारांचा कल वाढत असल्याचे दिसून आले आहे. मागील काही सत्रांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरचा भरणा असलेल्या पीएसयू फंडांमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. 

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या आकर्षक मूल्यामुळे गुंतवणूकदारांचा कल वाढत असल्याचे दिसून आले आहे. मागील काही सत्रांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरचा भरणा असलेल्या पीएसयू फंडांमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. 

मध्यम आणि दीर्घ कालावधीत सरकारी कंपन्यांची कामगिरी उंचावेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. पीएसयू फंड श्रेणीतील इन्व्हेस्को इंडिया पीएसयू इक्विटी फंड गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय ठरत आहे. बाजारातील 25 मोठ्या कंपन्यांपैकी पाच सरकारी कंपन्यांचा समावेश आहे. एकूण बाजार भांडवलापैकी त्यांचा 12 टक्के हिस्सा आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या "निफ्टी 50' कंपन्यांमध्ये 8 सरकारी कंपन्यांचा समावेश आहे. बहुतांश सरकारी कंपन्यांचे सध्याचे मूल्य आकर्षक असून त्यांचे व्यवस्थापन मजबूत आहे.

दहा वर्षात घेतले चुकीचे निर्णय ; स्टेट बँकेची कबूली 

केंद्र सरकारने निर्गुंतवणूक किंवा विक्रीचा निर्णय घेतल्यास नजीकच्या काळात या सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी येऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. काही सरकारी कंपन्यांमधील हिस्सा विक्री करण्याचे नियोजन सरकारने केले आहे. काही कंपन्या भांडवली बाजारात नोंदणी करतील, असा अंदाजही जाणकारांनी व्यक्त केला आहे. एसअँडपी बीएसई पीएसयू इंडेक्‍स सध्या 10.11 पीईवर व्यवहार करत आहे. 10 वर्षाचा 12.01 टक्‍क्‍याच्या सरासरीमध्ये तो सध्या 20 टक्के सवलतीत आहे.

कर्क राशीला मनासारखी आर्थिक आवक; जाणून घ्या आर्थिक राशीभविष्य

प्राईस टू बुक पाहता तो 0.81 वर व्यवहार करत आहे. एसअँडपी बीएसई सेन्सेक्‍स इंडेक्‍स 22.68 वर व्यवहार करत असून पीएसयू इंडेक्‍स 55 टक्के सवलतीत आहे. त्यामुळे मध्यम आणि दीर्घ कालावधीत सरकारी कंपन्यांची कामगिरी उंचावेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. पीएसयू फंड श्रेणीतील इन्व्हेस्को इंडिया पीएसयू इक्विटी फंड गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय ठरत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Investors' tendency towards PSU funds increased