Phone Tapping Case: 'शक्य नाही..!!' रश्मी शुक्लांचे मुंबई पोलिसांना उत्तर

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीतील भ्रष्टाचार प्रकरणात रश्मी शुक्लांना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने बजावले समन्स
rashmi shukla
rashmi shukla
Summary

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीतील भ्रष्टाचार प्रकरणात रश्मी शुक्लांना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने बजावले समन्स

मुंबई: फोन टॅपिंग प्रकरणी वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना सायबर पोलिसांनी समन्स पाठवून 28 एप्रिलला जबाब नोंदवण्यासाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. या संदर्भात शुक्ला यांनी ई-मेल पाठवून कोविड परिस्थिती व हैदराबादमधील त्यांच्या कामाचा आवाका पाहता उपस्थित राहणे शक्य नसल्याचे कळवले आहे. तसेच शुक्ला यांनी पोलिसांकडे प्रश्नावली मागितली असून त्याची उत्तर पाठवण्यास संमती दर्शवल्याचे वरिष्ठ अधिका-याने सांगितले. बीकेसी सायबर पोलिसांकडून ठाण्यात फोन टॅपिंगबद्दल दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्यात आले होते. त्याला रश्मी शुक्लांनी ई-मेलवरून उत्तर पाठवलं.

rashmi shukla
परमबीर सिंग यांनी फोन टॅपिंगमध्ये नाव घेतलेल्या रश्मी शुक्ला कोण आहेत?

सुरूवातीला हा जबाब बीकेसी सायबर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात येणार होता. मात्र कोरोनाची स्थिती पाहुन तो रश्मी शुक्ला यांच्या मुंबईतील सरकारी निवासस्थानात नोंदविण्यात येण्यास सांगण्यात आले. भारतीय टेलिग्राफी अॅक्ट कलम 30, माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 43 व 46 तसेच ऑफिशियल सीक्रेट अॅक्ट अंतर्गत रश्मी शुक्ला यांना हे समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार 28 एप्रिलला हा जबाब रश्मी शुक्ला यांच्या घरी नोंदविण्यात येणार होता. त्यााबबत रश्मी शुक्ला यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी हे समन्स पाठण्यात आले होते.

rashmi shukla
राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांचे रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप

रश्मी शुक्ला या सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक आहेत. हैदराबाद येथे त्या कार्यरत आहे. फेब्रुवारीपासून त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. शुक्ला यांनी पोलिसांच्या समन्सला ई-मेलद्वारे उत्तर दिले. सायबर पोलिस ठाण्याच्या प्रभारी पोलिस निरीक्षक शर्मिला सहस्त्रबुद्धे यांच्या कार्यालयीन ई-मेलवर शुक्ला यांनी हा ई-मेल पाठवला आहे. त्याची प्रत मुंबईचे पोलिस आयुक्त, राज्याचे पोलिस महासंचालक व सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंग यांच्या कार्यालयीन ईमेलवर पाठवण्यात आली.

rashmi shukla
सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले महत्वाचे इनपुट, रश्मी शुक्ला यांच्यावर आता गुन्हा दाखल होण्याची शक्यता !

या ई-मेलनुसार त्यांनी सांगितलं की, मला सायबर पोलिस ठाण्यात दाखल एफआयआर क्रमांक02-21 अंतर्गत 28 एप्रिलला सकाळी 11 वाजता माझ्या निवासस्थानी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. मी सध्या सीआरपीएफच्या विशेष महासंचालक, दक्षिण विभाग म्हणून सध्या हैदराबादमध्ये कार्यरत आहे. सध्याची कोविडची स्थिती व माझ्यावरील महत्त्वपूर्ण जबाबदारी यामुळे मला सध्या माझे कार्यालय सोडून मुंबईला प्रवास करणे शक्य नाही, असे शुक्ला यांनी ईमेलमध्ये म्हटले आहे. तसेच वरील प्रकरणी मी तुम्हाला संपूर्ण सहकार्य करू इच्छिते. या प्रकरणी दिरंगाई रोखण्यासाठी तुम्ही मला प्रश्नावली पाठवल्यास मी त्याची तात्काळ उत्तरे पाठवू शकेन. तसेच मला या प्रकरणात दाखल एफआरआरची प्रतही पाठवून द्यावी, असेही या ई-मेलमध्ये शुक्ला यांनी म्हटले आहे. त्या बदल्यात शुक्ला यांनी त्यांचा लँडलाईन क्रमांक व कार्यालयीन ई-मेल पाठवला असून यावर आपण उपलब्ध असल्याचे शुक्ला यांनी सायबर पोलिसांना कळवले आहे. त्यावर आता सायबर पोलीस काय पाऊल उचलतात, हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

(संपादन- विराज भागवत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com