नाराजीनाट्यानंतर संजय पांडेंकडे महासंचालक पदाचा अतिरिक्त पदभार

नाराजीनाट्यानंतर संजय पांडेंकडे महासंचालक पदाचा अतिरिक्त पदभार

मुंबई: स्वच्छ प्रतिमा आणि गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाईसाठी प्रसिद्ध असलेल्या संजय पांडे यांना राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला. शुक्रवारी रात्री उशीरा याबाबतचे आदेश गृहविभागाकडून जारी करण्यात आले. संजय पांडे हे 1986च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. 1992-93 मध्ये मुंबईत उसळलेल्या जातीय दंगलीच्या वेळी ते पोलीस उपायुक्त होते. 1995 ते 1999 या युती सरकारच्या कालावधीतील एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात राजकीय दबाव झुगारून त्यांनी कारवाई केली होती. यापूर्वी रजनीश सेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण आता ही जबाबदारी पांडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

संजय पांडे सरकारविरोधात कोर्टात जाण्याच्या तयारीत होते. सचिन वाझे प्रकरणावरुन राज्याच्या राजकारणात खळबळ उडालेली असताना वरिष्ठ IPS अधिकारी संजय पांडे सरकारवर नाराज असल्याची माहिती होती. वरिष्ठ असूनही पोलीस महासंचालकपदी नियुक्ती न केल्याने संजय पांडे यांनी न्यायालयात जाणार असल्याचं म्हटलं होतं. पदोन्नतीच्या बाबतीत सरकारने वेळोवेळी डावलल्याने संजय पाडे नाराज होते. ते न्यायालयात याचिका दाखल करणार होते. सरकारकडून वेळोवेळी पदोन्नतीसाठी डावलण्यात आल्याचा आरोप पांडे यांनी केला आहे. सरकार प्रोटोकॉलचं पालन करत नसल्याचा त्यांचा आरोप होता. त्यानंतर त्यांना शुक्रवारी रात्री उशीरा हा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला.

परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्यानंतर मुंबईचे आयुक्तपद रिक्त झाले. तेथे संजय पांडे यांच्यापेक्षा तुलनेने कनिष्ठ असणाऱ्या अधिकाऱ्याला प्रमुखपदी नेमण्यात आले. पण आता मात्र परमबीर सिंह यांची खातेनिहाय चौकशी केली जाणार असून ही चौकशी संजय पांडे करणार आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप करणारे परमबीर सिंह यांच्याविरोधात चौकशीचे आदेश गृहविभागाने जारी केले आहेत. महासंचालक दर्जाचे अधिकारी संजय पांडे ही चौकशी करणार आहेत. मुंबई पोलीस दलाकडून या प्रकरणी एक अहवाल गृहविभागाला सादर करण्यात आला होता, त्याच्या आधारावर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

(संपादन- विराज भागवत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com