मोठी बातमी! दक्षिण आफ्रिकेतील विमाने बंद करणार?

flight
flightsakal

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगाची चिंता वाढली आहे. या साऊथ अफ्रिकन व्हेरिएंमुळे सध्या ब्रिटनने देखी सहा देशांचा विमानप्रवास बंद केला आहे. याव्यतिरिक्त अन्य काही देशांमध्ये नवा व्हेरिएंट सापडल्याने तिसऱ्या लाटेची नांदी समजली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोनाच्या परिस्थितीवर तत्काळ बैठक बोलावली आहे. याच दरम्यान, मुंबई मनपा आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी शासनाला विनंती केल्याचं समजतंय. दक्षिण अफ्रिकेतील विमानांचं नियमन करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच जमल्यास या विमान प्रवासावर काही काळासाठी बंदी घालण्याचं आवाहन त्यांनी केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्या दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. यामध्ये सध्या कानपूरमध्ये सामना सुरू असून येत्या 4 डिसेंबरला दुसरी कसोटी मुंबईत सुरू होणार आहे. सध्या वानखेडे स्टेडियम होणारा हा सामना केवळ 50 टक्के प्रेक्षक उपस्थितीत होण्याची शक्यता त्यामुळे वाढली आहे.

नवा व्हेरिएंट अधिक घातक असल्याचे रिपोर्ट

एक नवीन, संभाव्यतः कोरोनाव्हायरसचा प्रकार, जो वेगाने पसरत आहे. त्याबाबत शास्त्रज्ञांनी धोक्याची घंटा वाजविली होती. अनेक देशांत प्रवास बंदी लादण्यात आल्या असून आर्थिक बाजारपेठा डबघाईला येत आहेत, कारण जगाला साथीच्या आजारावरून आणखी एक धक्का बसण्याची भीती होती. याच उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर काही देशांनी आणीबाणी जाहीर केलीय तर काहींनी शाळा, ऑफिसेस पुन्हा एकदा बंद केलीत.

आफ्रिकेतल्या सहा देशातून येणाऱ्या विमानांवरही बंदी घालण्यात आलीय. B.1.1.529 असं कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं नाव असून तो अधिक घातक असल्याचे रिपोर्ट आहेत. विशेष म्हणजे हा नवा व्हेरिएंटनं त्या देशात धूमाकुळ घातलाय जिथं लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. म्हणजेच कोरोनाच्या व्हेरिएंटला रोखण्यात लस अपयशी ठरतेय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com