

Tejas Express Ukadiche Modak
ESakal
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयआरसीटीसीने मुंबई-मडगाव तेजस एक्स्प्रेसमधील सर्व प्रवाशांना पारंपरिक उकडीचे मोदक देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे हा मोदकांचा खास बेत केवळ गणेशोत्सवाच्या कालावधीतच उपलब्ध असणार आहे. त्यामुळे धावत्या रेल्वेतच गणेशोत्सवाचा गोडवा आणि कोकणच्या घरगुती चवीची अनुभूती प्रवाशांना मिळणार आहे.