esakal | लाॅकडाऊनमुळे मासिक पाळीमध्ये अनियमितता; महिलांच्या दिनचर्येत मोठा बदल; मानसिक तणावही वाढला...
sakal

बोलून बातमी शोधा

लाॅकडाऊनमुळे मासिक पाळीमध्ये अनियमितता; महिलांच्या दिनचर्येत मोठा बदल; मानसिक तणावही वाढला...

महिलांच्या दैनंदीन जीवनशैलीत अनेक बदल झाले आहेत. तसेच, कोरोनामुळे मानसिक दबावही आल्याने मासिक पाळीमध्ये अनियमितता होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

लाॅकडाऊनमुळे मासिक पाळीमध्ये अनियमितता; महिलांच्या दिनचर्येत मोठा बदल; मानसिक तणावही वाढला...

sakal_logo
By
मिलिंद तांबे - सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना संसर्गामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये बहुतांश कर्मचारी घरात बसून काम करत आहेत. त्यामुऴे महिलांच्या दैनंदीन जीवनशैलीत अनेक बदल झाले आहेत. तसेच, कोरोनामुळे मानसिक दबावही आल्याने मासिक पाळीमध्ये अनियमितता होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मानसिक तणाव आणि खाण्यातील बदलाचे हे परिणाम असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

लॉकडाऊनच्या काळात महिलांच्या दिनचर्येत मोठा बदल झाला. या काळात अयोग्य आहार आणि अतिरीक्त तणावामुळे बीजांडात स्त्रीबीज उत्पादनाला विलंब होत असून किंवा उत्पादनाची प्रकिया थांबत आहे. त्यामुळे मासिक पाळी लांबते किंवा अधिक पाळी येते, असे स्त्रिरोग तज्ज्ञ डॉ. अंशुमाला शुक्ला-कुलकर्णी यांनी सांगीतले.

मासिकपाळीदरम्यान शरीरातील हार्मोन्समध्ये व्यापक बदल होतात. त्याचा परिणाम मासिक पाळीवर होतो. जर रुग्णांमध्ये पॉलीसिस्टिक डिसीज म्हणजे स्त्रियांच्या बीजांडा संबंधी काही आजार असेल तर, या काळात तो पुन्हा जागृत होतो. त्यामुळे या काळात नियंत्रित आहार घेणे महत्वाचे आहे. या काळात तूमच्या आहारात रिफाईन साखर, पीठाचा वापर टाळा. खाद्यतेलाचा वापर कमी करा व महत्त्वाचे म्हणजे आहारही कमी करा, असा सल्ला डॉ अंशुमाला शुक्ला-कुलकर्णी यांनी दिला. 

हॉर्मोन्स बदल आणि  ओटीपोटाच्या अनियमीत वाढीमुळे रक्तस्त्राव होतो. त्यावेळी लक्ष देणे आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास कर्करोगाकडे वाटचाल होऊ शकते. पाच दिवसापेक्षा जास्त रक्तस्त्राव होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. दोन महिन्यापासून मासिक पाळी होत नसेल तर, नियमित उपचाराची गरज असल्याचे डॉ अंशुमाला शुक्ला, कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

ध्यानसाधनाही उपयोगी
कोरोना संसर्गामुळे चिंता, मानसिक तणावामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या काळात चिडचीड न करता, शांत राहण्यासाठी धान्यसाधनेचा वापर करावा. तूम्ही थायरॉईड आणि हार्मोन्स संदर्भातील औषधे घेत असाल तर ती नियमित घ्या. नियमीत मासिक पाळी येत नसेल, तर डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. घरातल्या घरात नियमीत व्यायाम करा, योगा किंवा इतर व्यायामाची आसने करा. त्यासाठी जीममध्ये जाण्याची आवश्यकता नसल्याचे, डॉ अंशुमाला-कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

loading image