
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे पाहून अनेक हाऊसिंग सोसायटींनी नवा मार्ग स्वीकारला आहे. त्यांनी आपल्या सोसायटीतील लोकांचे उपचार तसेच विलगीकरण चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपल्या सोसायटीतच विलगीकरणाची सुविधा करण्याचे ठरवले आहे.
मुंबई ः कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे पाहून अनेक हाऊसिंग सोसायटींनी नवा मार्ग स्वीकारला आहे. त्यांनी आपल्या सोसायटीतील लोकांचे उपचार तसेच विलगीकरण चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपल्या सोसायटीतच विलगीकरणाची सुविधा करण्याचे ठरवले आहे.
मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कांदीवली पश्चिममधील विश्वदीप हाईटस्ने सोसायटीतील लोकांसाठी काय करता येऊ शकते हेच दाखवले आहे. 67 अपार्टमेंट आणि नऊ व्यावसायिक आस्थापने असलेल्या या सोसायटीत एकंदर 21 इमारती आहेत. त्यांनी आता विलगीकरणासाठी दोन बेड उपलब्ध केले आहेत आणि त्यात वाढ करण्याची तयारी केली आहे. या दोन रुममध्ये स्वतंत्र स्वच्छतागृहही आहेत.
विलगीकरण कक्षात ऑक्सिजन सिलींडर, बेडस्, मॅट्रेस, वापरानंतर फेकता येतील अशी बेडशीटस्, हॅंड सॅनिटायझर, डिजीटल थर्मामीटर, पल्स ऑक्सीमीटर, एन - 95 मास्क, निर्जंतुक स्प्रे मशीन, गरम पाण्याची किटली यासारख्या सुविधा आहेत. या सुविधांसाठी एकंदर 50 हजार खर्च आला, पण त्यासाठी सोसयटीतील प्रत्येक घराने आपला वाटा ऊचलला आहे. तो अवघा 850 आहे. विलगीकरण सांगितल्यास रुग्णालयात राहण्यापेक्षा या जागेत राहणे कधीही कमी खर्चाच असेल हाच विचार करम्यात आला आहे. त्याचबरोबर रुग्णाला घरचे खाणे देणेही सहज शक्य होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोसायटीतील कोणावरही आता उपचारासाठी जागा शोधण्यासाठी फिरावे लागणार नाही, असाही विचार करण्यात आला आहे.
ब्रेकिंग: अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गळफास घेऊन आत्महत्या
कांदीवलीतील या सोसायटीने केलेल्या सुविधा समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्या नसत्या तरच नवल होते. सोसायटीतील अनेक जणांना यासाठी काय केले हे विचारले जात आहे. सोसायटीने सुरुवातीस मांडलेल्या या संकल्पेनेच महापालिकेने लगेच स्वागत केले. काही दिवसात अनेक जण कामावर जाण्यास सुरुवात होईल. या परिस्थितीत धोका वाढू शकतो. त्यामुळे या सुविधांची गरज आहे, असे सांगण्यात आले. कांदीवलीचा आदर्श घेऊन बोरीवलीतील सोसायटीनेही याची सुरुवात केली आहे. एवढेच नव्हे तर काही सामाजिक मंडळांनी आपल्या कार्यालयासाठी याचा विचार सुरु केला आहे.