एक लाख कोटी रुपयांचे धनादेश रखडले; केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध

strike
strikesakal media

मुंबई : देशातील सर्व कामगार संघटनांनी (workers union) दिलेल्या दोन दिवसीय देशव्यापी संपाच्या हाकेमुळे (strike) आज पहिल्याच दिवशी देशभरातल्या सर्व बँकांमधील मिळून सुमारे एक लाख कोटी रुपयांचे धनादेश वठवण्याचे (one lac crore cheque) काम ठप्प झाले. देशात वीस कोटी कर्मचारी व कामगारांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा (central government policy) निषेध केला. देशातील कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या संपात केवळ स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि इंडियन ओव्हरसीज बँकेचे कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले नव्हते.

strike
मालेगाव : शहरातील दोन दुर्घटनेत दोन चिमुकल्यांचा मृत्यू

त्यामुळे त्या बँकांच्या कामावर फारसा परिणाम झाला नाही, तर मुंबईतील बँकांमध्ये शिवसेनाप्रणीत कामगार संघटना सहभागी नसल्याने तेथे तुरळक व्यवहार झाले. त्याखेरीज देशातील पाच लाख बँक कर्मचारी कामावर आले नाहीत. रोज देशभरातील सर्व बँकांमध्ये मिळून एक लाख कोटी रुपयांपर्यंत धनादेश वठवले जातात. त्या कामावर आज मोठा परिणाम झाला; मात्र इंटरनेट बँकिंग तसेच डिमॅटचे व्यवहार सुरू होते.


इंटक, एआयटीयूसी, हिंद मजदूर सभा, सिटू, एआयटूसीटूसी, टीयूसीसी आदी दहा प्रमुख संघटनांनी संयुक्तपणे या संपाची हाक दिली होती. सरकारी कंपन्यांचे खासगीकरण रद्द करावे, सरकारचे कामगार कायदे मागे घ्यावेत, कंत्राटी कामगारांना कायम करावे व कंत्राटीकरणाचे धोरण राबवू नये या त्यांच्या मुख्य मागण्या आहेत. बँका, विमा कंपन्या, पोस्ट, दूरसंचार, कोळसा, तेल कंपन्या या खात्यांमधील कर्मचारी, तसेच असंघटित कामगार या संपात सहभागी झाले होते.

strike
मुंबई : गायीनेच पायाने झाकण बाजूला केले; अधिकाऱ्यांचा अजब निष्कर्ष

विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचा सहभाग

रेल्वे आणि संरक्षण खात्यातील कर्मचाऱ्यांनी देशात अनेक ठिकाणी निदर्शने केली, तर अंगणवाडी-आशा वर्कर, मध्यान्न आहार योजनेतील कर्मचारी, शेतमजूर, विक्रेते आदींनीही देशभरात अनेक ठिकाणी चक्काजाम-रेल रोको आंदोलन केले. तमिळनाडू मध्ये पोस्ट व आयकर खात्याच्या कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली तर हरयाणात अत्यावश्यक सेवा कायदा धुडकावून तेथील परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी संप केला.

गोवा, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, बिहार, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल येथेही बंदसदृष्य वातावरण होते, अशी माहिती कामगार संघटना संयुक्त कृती समिती (महाराष्ट्र राज्य) चे निमंत्रक ज्येष्ठ कामगार नेते विश्वास उटगी यांनी दिली. नाशिक जिल्ह्यात सिटू संलग्न कारखाने, त्याचबरोबर बांधकाम मजूर, घर कामगार, असंघटित कामगारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सातपूर, सिडको, नाशिक रोड, सिन्नर, इगतपुरी, मालेगाव, दिंडोरी, निफाड येथे आंदोलन केल्याची माहिती ज्येष्ठ कामगार नेते डी. एल. कराड यांनी दिली.

तर बेमुदत संप!

मुंबईत आझाद मैदानात आज बँक कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येत जमा होऊन निदर्शने केली. आयडीबीआय, आयओबी, एलआयसी यांचे खासगीकरण होऊ नये, अशा घोषणा दिल्या जात होत्या. केंद्राने या संसद अधिवेशनात बँकिंग कामकाज सुधारणा दुरुस्ती विधेयक मांडले, तर देशात संपाची मालिकाच उभी राहील आणि प्रसंगी बेमुदत संप केला जाईल, असा इशारा स्टेट फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी देविदास तुळजापूरकर यांनी दिला. बँक कर्मचाऱ्यांनी राज्यात पुणे, सोलापूर, औरंगाबाद, लातूर, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी येथेही निदर्शने केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com